मुंबई - एकविसाव्या शतकामध्ये वेगवेगळ्या सोयी सुविधांचा लाभ घेत माणूस जगत असला तरी त्याच्या विचारांमध्ये मागासलेपणा अदयापही शिल्लक असल्याचे दिसून आले आहे. जातपात, वर्णवर्चस्व यामध्ये अडकून पडले आहेत. उत्तराखंडमध्ये झालेल्या त्या घटनेनं लक्ष वेधून घेतले आहे. ज्या भागात ही अमानुष घटना घडली तिथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. लग्नाच्या समारंभात उच्च जातीच्या लोकांमध्ये जेवायला बसल्यानं एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. ती व्यक्ती दलित समाजाची असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
याप्रकरणी एसआयटीची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेमध्ये एका 55 वर्षीय दलित व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. ही घटना उत्तराखंडमधील चंपावर जिल्ह्यामध्ये घडली आहे. याप्रकरणी अधिक माहिती देताना पोलीस अधिकारी देवेंद्र पिंचा यांनी सांगितलं की, आम्ही या घटनेच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. आता या प्रकरणाचा वेगानं तपास करण्यात येणार आहे. आम्ही लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. सध्या त्या भागात तणावाचे वातावरण आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 55 वर्षीय रमेश राम हे इजात्ता डुंगारा नगर येथे राहणारे होते. ते एका समारंभात गेले होते. त्यानंतर पुढील दिवसात त्यांची हत्या करण्यात आली. एका रुग्णालयामध्ये त्यांचा मृतदेह मिळाला. यानंतर राम यांच्या पत्नीनं पोलिसांकडे तक्रार दिली. त्यात तिनं आपल्या पतीला काही उच्च जातीच्या लोकांकडून मारहाण केल्याचे सांगितले. त्याचं कारण म्हणजे त्यांनी उच्च जातीतल्या लोकांसमवेत जेवण घेतले होते. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.