उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिला राजीनामा

नवीन सरकार स्थापन होईपर्यंत पुष्कर सिंह धामी कार्यरत राहणार.
Pushkar-Singh-Dhami
Pushkar-Singh-Dhami
Updated on

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा आज दिला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर धामी यांनी राजीनामा दिला. त्यांनी राज्यपाल गुरमीत सिंग (Gurmit Singh) यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. मात्र, राज्यपालांनी त्यांना नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काम करत राहण्यास सांगितले आहे.

Pushkar-Singh-Dhami
चंद्रकांत पाटलांनी ढोल वाजवत केले देवेंद्र फडणीवसांचे स्वागत

उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पक्षाला (BJP) बहुमत मिळाले पण मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा पराभव झाला. यानंतर आता राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आज याबाबत महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.

Pushkar-Singh-Dhami
जम्मू-काश्मीरातील गुरेझमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले

प्रतिक्रिया देताना पुष्कर सिंह धामी म्हणाले की, मी माझ्या पक्षाचा आणि पंतप्रधान मोदींचा आभारी आहे की त्यांनी मला जनतेच्या सेवेसाठी निवडले. उत्तराखंडमध्ये पहिल्यांदाच हा समज मोडला असून भाजपने २/३ बहुमताने सरकार स्थापन केले आहे. भविष्यातही आम्ही सर्व आश्वासने पूर्ण करू.

खातिमा मतदारसंघातून पुष्कर सिंह धामी यांचा पराभव

पुष्कर सिंह धामी खतिमा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक हरले आहेत. भाजपच्या नेत्याचा काँग्रेसच्या भुवनचंद्र कापरी यांनी ६,५७९ मतांनी पराभव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.