Haldwani Violence : हलद्वानीच्या बुलडोजर कारवाईनंतर मशीद अन् मदरशाच्या जागी 'ही' इमारत उभी राहणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

उत्तराखंडच्या हलद्वानीच्या बनभूलपुरा येथील अवैध मशीद आणि मदरशावर बुलडोजर कारवाई झाल्यानंतर हिंसाचार पेटला होता. या घटनेनंतर उत्तराखंडचं पुष्करसिंह धामी सरकार हाय अलर्ट मोडवर आहे. सातत्याने हिंसा पसरवणाऱ्या आरोपींविरोधात कडक कारवाई केली जात आहे.
Haldwani violence
Haldwani violenceesakal
Updated on

नवी दिल्लीः उत्तराखंडच्या हलद्वानीच्या बनभूलपुरा येथील अवैध मशीद आणि मदरशावर बुलडोजर कारवाई झाल्यानंतर हिंसाचार पेटला होता. या घटनेनंतर उत्तराखंडचं पुष्करसिंह धामी सरकार हाय अलर्ट मोडवर आहे. सातत्याने हिंसा पसरवणाऱ्या आरोपींविरोधात कडक कारवाई केली जात आहे.

ज्या ठिकाणची अवैध मशीद पाडण्यात आली त्या ठिकाणासंबंधी मुख्यमंत्री धामी यांनी पोलिस स्टेशन बांधण्याची घोषणा केली आहे. आता त्या जमिनीवर पोलिस ठाणं बांधण्यात येईल, असं धामी म्हणाले.

नुकत्याच पार पडलेल्या नारी शक्ती महोत्सवात मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सहभाग घेतला होता. त्या कार्यक्रमात बोलताना धामी यांनी म्हटलं की, अराजकता पसरवणाऱ्या टोळक्यांकडून महिला पोलिस कर्मचाऱ्यांसह इतर पोलिस कर्मचारी आणि पत्रकारांवर ज्या पद्धतीने हल्ले झाले ते निंदनीय आहेत. बनभूलपुरामधील अनेक एकरावरील क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आलेलं आहे.

Haldwani violence
Ashok Chavan: तुमच्या वडिलांना, तुम्हाला काँग्रेसने खूप काही दिलं, तरी... बाळासाहेब थोरातांचा चव्हाणांवर घणाघात

मुख्यमंत्री धामी पुढे म्हणाले की, मी आज गंगेच्या पवित्र तीरावरुन घोषणा करतो की, त्या जागेवर पोलिस स्टेशन बांधलं जाईल. याशिवाय त्यांनी 'एक्स' अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत म्हटलं की, उपद्रव माजवणाऱ्या आणि दहशत पसरवणाऱ्यांना आमच्या सरकारचा स्पष्ट इशारा आहे की त्यांनी देवभूमीला शांत ठेवावं. आमच्या शांततेचा तुम्ही भंग करणार असाल तर कुणालाही सोडलं जाणार नाही. अशा लोकांसाठी इथे जागा नाही.

दरम्यान, ८ फेब्रुवारी रोजी हलद्वानी येथील बनभूलपुरा येथे हिंसाचार उसळला होता. 'मलिक का बगीचा' या ठिकाणी उभारण्यात आलेली अवैध मशीद आणि मदरसा पाडण्यासाठी पोलिस आणि नगर परिषदेचे कर्मचारी दाखल झाले होते. यावेळी अराजकता पसरवणाऱ्या टोळक्याने दगडफेक केली, पुढे त्यांनी पेट्रोल बॉम्ब फेकले. त्यात मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यानंतर हल्लेखोरांनी पोलिस ठाणं पेटवून दिलं होतं.

Haldwani violence
AUS vs WI : ऑस्ट्रेलियात कॅरिबियन खेळाडूचे तुफानी वादळ! टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांची विश्वविक्रमी भागीदारी

घटनेनंतर मुख्यमंत्री धामी यांनी तातडीची बैठक बोलावून हिंसा पसरवणाऱ्यांविरोधात कारवाईचे आदेश दिले होते. तेव्हापासून पोलिस सातत्याने आरोपींना शोधून ताब्यात घेत आहेत. या प्रकरणातील मास्टर माईंड अब्दुल मलिक यालाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.