तुफान पाऊस अन् बर्फवृष्टीमुळे केदारनाथ यात्रा थांबवली

पावसाचा जोर वाढला असल्याने सलग दुसऱ्या दिवशीही यात्रा थांबवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला
kedarnath
kedarnathgoogle
Updated on
Summary

पावसाचा जोर वाढला असल्याने सलग दुसऱ्या दिवशीही यात्रा थांबवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला

सध्या उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) पावसाने जोरदार थैमान घातले आहे. त्यामुळे केदारनाथ परिसरात सलग सात तास झालेल्या बर्फवृष्टी आणि मैदानी भागांतील पावसामुळे केदारनाथ यात्रा तूर्तास थांबवण्यात आली आहे. उत्तराखंड सरकारने सोमवारी ही घोषणा केली. या परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पावसाचा जोर वाढला असल्याने सलग दुसऱ्या दिवशीही यात्रा थांबवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. (Heavy Rain in Kedarnath)

हवामान बदलल्यामुळे सध्या या ठिकाणची हेलिकॉप्टर सेवा बंद करण्यात आली आहे. केदारनाथ देवस्थानाकडे (Kedarnath Teample) जाणाऱ्या यात्रेकरूंना थांबवण्यात आले असून त्यांना हॉटेलांकडे परतण्यास सांगितले आहे. केदारधाम येथे असणाऱ्या भाविकांना मैदानी भागांमध्ये स्थलांतरितही करण्यात आलं आहे. प्रशासनाकडून यात्रेच्या विविध थांब्यांच्या ठिकाणी सध्या परिस्थितीचा पूर्ण आढावा घेतला जात आहे. (Kedarnath yatra)

kedarnath
'बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? ब्रह्मदेवाला चुकवून...' सदाभाऊंचा खोचक टोला

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीप्रमाणे, सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पायी प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना ते असतील तेथे थांबवण्यात आले असून त्यांना हॉटेलांकडे परत फिरण्याची विनंती केली आहे. सध्या कुणीही मंदिराकडे मार्गक्रमण करू नये आणि सुरक्षित राहावे, असे सांगण्यात आले आहे. सोमवारी दिलेल्या ऑरेंज अलर्टची मुदत मंगळवापर्यंत आहे. गुत्पकाशीपासून सुमारे पाच हजार लोकांना मार्गावर थांबवून परत पाठवले आहे.

दरम्यान, उत्तरकाशीमध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळं प्रशासनानं यमुनोत्री यात्राही थांबवण्याचा निर्णय घेतला. जानकीचट्टी येथे ही यात्रा थांबवण्यात आली असून वातावरणात सकारात्मक बदल झाल्यानंतर यात्रा सुरु होणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये केदारनाथ आणि एकंदरच चारधाम यात्रेला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. लॉकडाऊननंतर भाविकांचे पाय या ठिकाणांकडे वळले आहेत. पण, यामध्ये हवामानाचा मारा मात्र प्रत्येकाचीच यात्रा खडतर करत आहे हे नाकारता येत नाही.

kedarnath
मुलाने मुलाशी लग्न केलं तर कोणी जन्माला कसं येईल? - नितीश कुमार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.