नैनीतालः उत्तराखंडच्या नैनीताल जिल्ह्यामध्ये बेतालघाट विकासखंड येथील उंचाकोट भागात भीषण रस्ते अपघात झाला आहे. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. बेतालघाट ब्लॉकच्या उंचाकोटमधील मल्लागावात रात्री उशिरा दहा नेपाळी लोकांच्या गाडीला अपघात झाला.
एका बोलेरो गाडीतून १० लोकांना टनकपूर येथे नेलं जात होते. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी २०० मीटर खोल दरीमध्ये कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनाची टीम घटनास्थळी पोहोचली.
घटनास्थळी अंधार असल्याने रेस्क्यू करण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. संकटांचा सामाना करत मृतांना आणि जखमींना बाहेर काढण्यात आलं. घटनास्थळीच सात लोकांचा मृत्यू झाला होता तर एकाचा मृत्यू रुग्णालयात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, बेतालघाटचे ठाणेदार अनिष अहमद यांनी सांगितलं की, रात्री उशिरा उंचाकोटच्या मल्लगाव येथील टनकपूरकडे १० नेपाळी लोकांना राजेंद्र कुमार हा आपल्या बोलेरो गाडीतून घेऊन जात होता. याचवेळी बोलेरोवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि गाडी दोनशे मीटर खोल दरीमध्ये कोसळली.
अपघातामध्ये मृत पावलेले सर्वजण नेपाळ येथील होते. ते जलजीवन मिशन अंतर्गत उंचाकोट येथे आले होते. कालचं काम संपल्यानंतर ते घरी माघारी जाणार होते. परंतु दुर्दैवाने त्यांचा अपघात झाला. दरीमध्ये वाहन कोसळल्याचा आवाज आल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी बचावकार्य सुरु केलं आणि त्यानंतर पोलिस दाखल झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.