Uttarkashi bus accident: भाविकांना घेऊन जाणारी बस खोल दरीत पडली; 8 जणांचा मृत्यू

Uttarkashi bus accident
Uttarkashi bus accidentesakal
Updated on

Uttarkashi bus accident:

डेहरादून- उत्तराखंडमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. ३५ प्रवाशांना घेऊन जाणारी एक बस खोल दरीत कोसळली आहे. अपघातामध्ये ८ लोकांचा मृत्यू झालाय तर २७ लोक जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेवर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दु:ख व्यक्त करत जखमी लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केलीये. बसमध्ये गुजरातमधील भाविक प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे.

गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झालाय. बस गुजरातमधील भाविकांना घेऊन गंगोत्रीकडे जात होती. गंगनानी येथे अपघात झाला आणि बस ५० मीटर खोल दरीमध्ये जाऊन कोसळली. यात ८ जणांचा मृत्यू झालाय. २७ जखमी लोकांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. घटनास्थळी मदकार्य सुरु आहे.

Uttarkashi bus accident
Kirit Somaiyya vs Sanjay Raut: किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यातील वादाच्या नव्या पर्वाला सुरुवात

अपघातानंतर मुख्यमंत्री धामी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ते म्हणाले, मृत्यू झालेल्या लोकांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची ताकद देवो. जखमी लोक लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. जिल्हा आरोग्य प्रशासनाला जखमींवर गुणवत्तापूर्ण उपचार करण्याचे आणि आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Uttarkashi bus accident
Indian Railway: भगव्या रंगाच्या पहिल्या वंदे भारत ट्रेनची झलक; 25 नव्या फिचर्ससह

अपघातानंतर उत्तरकाशीचे जिल्हाधिकारी अभिषेक रुहेला आणि पोलिस अधिक्षक अर्पण यदुवंशी मदत कार्य अभियानाची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. डीडीएमओ पेटवाल म्हणाले की, जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी अॅम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच गरज पडल्यास जखमींना दुसऱ्या आरोग्य केंद्रात नेण्यासाठी हेलिकॉप्टर तयार ठेवण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com