उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे रविवारी पहाटे एक मोठा अपघात झाला. ब्रह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिलक्यारा ते डंडालगाव दरम्यान बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याच्या काही भागात सुमारे ४० मजूर अडकले. या बोगदा दुर्घटनेला २४ तासांहून अधिक काळ लोटला असून, ६० मीटर चा ढिगारा रकाढण्यात आला असून अजूनही ३० ते ३५ मीटर ढिगारा काढणे शिल्लक आहे.
उत्तरकाशीचे पोलिस अधीक्षक अर्पण यदुवंशी यांनी सांगितले की, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि पोलिस कर्मचारी यांच्याकडून दुर्घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य सुरू आहे. तसेच पाईपद्वारे ऑक्सिजन पाठविला जात आहे
कोसळलेला मातीचा ढिगारा हटवण्यासाठी अवजड खोदाई यंत्रे वापरली जात आहेत. दरम्यान गेल्या २४ तासांपासून अडकलेले सर्व कामगार सध्या सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे. बोगद्याला पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेल्या पाईपलाईनद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. या पाईपलाईनच्या माध्यमातून बोगद्यात अडकलेल्या मजुरांना रात्री कंप्रेसरच्या मदतीने दबाव तयार करून अन्न-पाणी पोहचवण्यात आले .
या बोगद्यात जे कामगार अडकले आहेत त्यामध्ये बिहारचे ४, उत्तराखंडचे २, बंदालचे ३, यूपीचे ८, उडिसाचे ५, झारखंडचे १५, आसामचे २ आमि हिमाचल प्रदेशचा एक जण आहे. या कामगारांशी वॉकी-टॉकीच्या मदतीने संपर्क करण्यात आला असून सर्व जण सुरक्षित आहेत. अडकलेल्या कामगारांना अन्न पाइपच्या माध्यमातून पोहचवण्यात आलं आहे.
तसेच मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल १६० बचाव कर्मचारी ड्रिलिंग उपकरणांच्या मदततीने अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
बोगद्याचं काम हे चार धाम ऑल वेदर रोड प्रकल्पाचा भाग आहे. यामुळे उत्तरकाशी ते यमुनोत्री धाम यांच्यातील अंतर २६ किलोमीटर कमी होणार आहे. या बोगद्याची लांबी ४.५ किमी आहे. चार किलोमिटरच्या बोगद्याचं काम पूर्ण झालं आहे. या बोगद्याचं काम सप्टेंबर २०२३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र प्रोजेक्टला उशीर झाला आहे. आता हे टनल मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.