पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना फोन करून उत्तरकाशीतील सिल्क्यराजवळ बोगद्यात अडकलेल्या कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या मदत आणि बचाव कार्याची माहिती घेतली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, केंद्र सरकारकडून आवश्यक बचाव उपकरणे आणि संसाधने पुरविली जात आहेत. केंद्र आणि राज्य संस्थांच्या परस्पर समन्वयाने कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढले जाईल. अडकलेल्या कामगारांचे मनोधैर्य राखण्याची गरज आहे.
सद्यस्थितीची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य आणि केंद्रीय यंत्रणा परस्पर समन्वयाने आणि तत्परतेने मदत आणि बचाव कार्यात व्यस्त आहेत. बोगद्यात अडकलेले कामगार सुरक्षित असून ऑक्सिजन, पौष्टिक अन्न आणि पाणी पुरवले जात आहे. तज्ज्ञांचे मत घेऊन एजन्सी मदत आणि बचाव कार्य करत आहेत.
मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी सांगितले की, त्यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून ते बचाव कार्यावर सतत लक्ष ठेवून आहे. तेथे वैद्यकीय पथकही तैनात करण्यात आले आहे. बोगद्यात अडकलेले सर्व कामगार सुखरूप असून त्यांना लवकर बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आत्तापर्यंत पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांकडून तीन वेळा परिस्थितीची माहिती घेतली आहे. पीएमओ टीमनेही घटनास्थळाची पाहणी केली असून ते सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि समन्वयाचे काम करत आहे.
अडकलेल्या कामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मनोधैर्य टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांच्याशी सतत संवाद साधून त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांमार्फत समुपदेशनाची व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. येथे येऊ इच्छिणाऱ्या कामगारांच्या कुटुंबाचा वाहतूक, भोजन, निवास आणि मोबाईल रिचार्जचा खर्च उत्तराखंड सरकार उचलणार आहे. या आपत्तीच्या काळात आपण सर्वांनी कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनोबल जपले पाहिजे.
मुख्यमंत्री धामी म्हणाले की, बोगद्यात अडकलेल्या कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढणे हे केंद्र आणि राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे, ज्याचा पंतप्रधान कार्यालयाकडून आढावा घेतला जात आहे. बोगद्याच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडमधील राज्य सरकारच्या बोगदा प्रकल्पांचा आढावा घेतला जाईल, असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला आहे.
ड्रिल दोन ते तीन दिवसांत होऊ शकते पूर्ण
बोगद्याच्या वर ड्रिलिंगसाठी जागा निवडण्यात आली आहे. ड्रिल 1.2 मीटर व्यासाची असेल. ज्याचा सेटअप येत्या २४ तासात होण्याची शक्यता आहे. आता दोन ते तीन दिवसांत ड्रील पूर्ण होऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.