Uttarakhand: माजी मंत्र्याचे हवन, PM मोदींची ग्वाही ! अडकलेल्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढू, मुख्यमंत्र्यांशी चर्चा

उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले जाईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्यासमवेत झालेल्या चर्चेनंतर व्यक्त केला.
Uttarkashi Tunnel Collapse
Uttarkashi Tunnel CollapseEsakal
Updated on

Uttarkashi Tunnel Incident: उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले जाईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्यासमवेत झालेल्या चर्चेनंतर व्यक्त केला. मोदी यांनी दूरध्वनीद्वारे धामी यांच्याशी संवाद साधत बचावकार्याचा आढावा घेतला. या कामगारांचे मनोधैर्य टिकवून ठेवणे आवश्यक असल्याचेही मोदी यांनी यावेळी धामी यांना सांगितले.

सिल्क्यारा बोगदा कोसळल्याने ४१ कामगार आठवड्यापासून अडकून पडले असून त्यांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहेत. या बचावकार्यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक उपकरणे आणि संसाधने पुरविली जात आहेत.

ही दुर्घटना झाल्यापासून पंतप्रधानांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामी यांच्याशी आज तिसऱ्यांदा संवाद साधून मदतर्याबद्दल माहिती घेतली. हे सर्व कामगार सुरक्षित असून त्यांना सातत्याने ऑक्सिजन व अन्नपाणी पुरविले जात आहे. बचावकार्यात तज्ज्ञांचीही मदत घेतली जात आहे. कामगारांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत, असे धामी यांनी यावेळी मोदींना सांगितले. पंतप्रधान कार्यालयाचे पथकही बचावमोहिमेवर लक्ष ठेवून आहे.(Latest Marathi News)

विजय गोयल यांच्याकडून हवन

उत्तराखंडमधील बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांच्या सुटकेसाठी माजी केंद्रीय मंत्री विजय गोयल यांनी सोमवारी दिल्लीतील कॅनॉट प्लेसमधील हनुमान मंदिरात हवन केले. ‘‘आम्ही सर्व कामगारांच्या सुखरूप सुटकेसाठी प्रार्थना करत आहोत. संपूर्ण देश त्यांच्यासाठी प्रार्थना करत असून हे सामान्य लोक असल्याने सर्वांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करावी,’’ असे आवाहनही त्यांनी केले. (Latest Marathi News)

Uttarkashi Tunnel Collapse
Kartiki Ekadashi : कार्तिकी महापूजेचा पेच आज सुटण्याची शक्यता, कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार महापूजा?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()