Uttarkashi Tunnel Rescue: सर्व कामगार बोगद्याबाहेर आल्यानंतर पहिल्यांदा होणार 'हे' काम; CM धामी यांची महत्वाची माहिती

यावेळी स्थानिक नागरिक या बोगद्याबाहेर गोळा झाले असून ते एकमेकांना लाडू भरवून आनंद व्यक्त करत आहेत.
Uttarkashi Tunnel Rescue: सर्व कामगार बोगद्याबाहेर आल्यानंतर पहिल्यांदा होणार 'हे' काम; CM धामी यांची महत्वाची माहिती
Updated on

नवी दिल्ली : उत्तरकाशीच्या सिल्क्यारा बोगद्यातून अडकलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्यात प्रशासनाला अखेर १७ दिवसांनंतर यश आलं आहे. टप्प्याटप्प्यानं या कामगारांना बोगद्यातून बाहेर काढलं जात आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी हे देखील घटनास्थळी असून त्यांनी या कामगारांशी बातचीत केली. तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. (Uttarkashi Tunnel Rescue health checkup will be done first after workers come out says CM Pushkar Singh Dhami)

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील काम

धामी म्हणाले, "हे सर्वजण बऱ्याच काळापासून एका वेगळ्या वातावरणातून बाहेर आले आहेत. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्ही पुढचं काम करणार आहेत. त्यानंतर त्यांना घरी पाठवायचं किंवा जे काही ते करण्यात येईल. पण आधी त्यांचं वैद्यकीय निरिक्षणाखाली त्यांना ठेवण्यात येईल" सर्वच्या सर्व कामगार हे नॉर्मल आहेत, कोणीही गंभीर नाही, असंही यावेळी मुख्यमंत्री धामी यांनी सांगितलं. (Marathi Tajya Batmya)

Uttarkashi Tunnel Rescue: सर्व कामगार बोगद्याबाहेर आल्यानंतर पहिल्यांदा होणार 'हे' काम; CM धामी यांची महत्वाची माहिती
Uttarkashi Tunnel Rescue: सर्व कामगारांना वाचवल्यानंतर गडकरींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले आता बोगद्याचं...

स्थानिकांनी व्यक्त केला लाडू भरवून आनंद

दरम्यान, आत्तापर्यंत या बोगद्यातून ३३ जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. यावेळी स्थानिक नागरिक या बोगद्याबाहेर गोळा झाले असून ते एकमेकांना लाडू भरवून आनंद व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर दिवाळीच्या दिवशीचं हे कामगार अडकल्यानं त्यांना दिवाळी साजरी करता आली नव्हती त्यामुळं आता पुन्हा एकदा दिवाळी साजरी करण्यात येईल, असंही काही स्थानिकांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.