Uttarkashi Tunnel Rescue: ‘‘आई, काळजी करू नको, मी ठिक आहे"; १० दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या मजुराचा संदेश

बोगद्यात अडकलेल्या मजुराचा पालकांना दिलासा
Uttarkashi Tunnel Rescue
Uttarkashi Tunnel Rescue
Updated on

Uttarkashi Tunnel Rescue: ‘‘आई, काळजी करू नको, मी ठिक आहे. तू आणि बाबा वेळेवर जेवण करा,’ असा संदेश देत सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या जयदेव या मजुराने पालकांना दिलासा दिला आहे.

बोगदा कोसळल्याने बांधकाम करणारे ४१ मजूर गेल्या दहा दिवसांपासून अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे पथक येथे पोहोचले आहे. बचावकार्यातील अधिकाऱ्यांनी मंगळवारी मजूर आणि त्यांच्या कुटुंबाचे संभाषण घडवून आणले. यामुळे मजुरांचे मनोबल वाढले आहे. (Uttarkashi news update)

मला माझ्या आईला काही सांगायचे आहे, असे सांगत जयदेवने त्याच्या पर्यवेक्षकाला संदेश रेकॉर्ड करण्यास सांगितले. मजुरांची सातत्याने संवाद साधला जात असून त्यांचे मनोधैर्य वाढवीत आहोत, असे अधिकारी म्हणाले.

‘चिंता करू नका, तुम्हाला सर्वांना लवकरात लवकर बाहेर काढले जाईल, असे पर्यवक्षेकाने मजुरांना सांगितले.

Uttarkashi Tunnel Rescue
Minority Development Scheme: शिंदखेडा मतदारसंघात एक कोटीचा निधी; आमदार रावल यांचा पाठपुरावा

उत्तरकाशीतील सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण काहींनी 10 दिवस बोगद्यात अडकल्यानंतर प्रथमच त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला आहे. मंगळवारी, सुरू असलेल्या बचाव कार्यात गुंतलेल्या अधिका-यांनी 6 इंच पाईप लाईनद्वारे कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये संभाषण शक्य केले. (Latest Marathi News)

दरम्यान, कामगारांना त्यांच्या कुटुंबियांना काही संदेश द्यायचा आहे का, अशी विचारणा करण्यात आली. यावर जयदेव यांनी त्यांचे बोलणे रेकॉर्ड केले आहे. हे व्हॉइस रेकॉर्डिंग त्याच्या पालकांना पाठवले जाईल. जयदेव व्यतिरिक्त इतर मजुरांनीही त्यांच्या कुटुंबियांना निरोप पाठवला आहे. ज्यामध्ये त्याने सांगितले आहे की तो बोगद्यात अडकला आहे, परंतु सर्वजण सुरक्षित आहेत आणि काळजी करण्यासारखे काही नाही. सर्वांना लवकर बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बोगद्यात बचावकार्य पूर्ण वेगाने सुरू-

इंटरनॅशनल टनेलिंग अँड अंडरग्राउंड स्पेस असोसिएशनचे अध्यक्ष अरनॉल्ड डिक्स, जे सध्या उत्तरकाशी बोगदा कोसळण्याच्या ठिकाणी सुरू असलेल्या बचाव प्रयत्नांवर देखरेख करत आहेत. ते म्हणाले की 6 इंची पाइपलाइन पूर्णपणे कार्यान्वित करण्यासाठी काम केले जात आहे. कामगारांसाठी सुरक्षित जागा निर्माण करण्यासाठी स्वतंत्र काम केले जात असून, सर्व कामगारांना बाहेर काढण्यासाठी कवायतीही केल्या जात आहेत. हे संपूर्ण काम अतिशय काळजीपूर्वक केले जात आहे.

Uttarkashi Tunnel Rescue
"थिएटरमध्ये दाखवायचे ब्लू फिल्म"; कुमारस्वामींच्या आरोपावर शिवकुमार काय म्हणाले?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.