Uttarkashi Tunnel Rescue: बोगद्यातील मजूर आज बाहेर येणार? अवघे काही मीटर राहिलं अंतर; कुटुंबीयांना बॅगा भरुन ठेवण्याचे निर्देश

बचाव पथकाने कामगारांच्या नातेवाईकांना कपडे आणि बॅग तयार ठेवण्यास सांगितले आहे. कामगारांना बोगद्याच्या बाहेर काढल्यानंतर पहिल्यांदा त्यांना रुग्णालयात नेण्यात येईल.
Uttarkashi Tunnel Rescue
Uttarkashi Tunnel RescueEsakal
Updated on

उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेस्क्यू टीम बोगद्याच्या वरून रैट होल माइनिंग आणि बोगद्याच्या वरून ड्रिलिंग करत आहेत. लवकरच कामगारांना बाहेर काढले जाईल, अशी आशा आहे. बचाव पथकाने कामगारांच्या नातेवाईकांना कपडे आणि बॅग तयार ठेवण्यास सांगितले आहे. कामगारांना बोगद्याच्या बाहेर काढल्यानंतर पहिल्यांदा त्यांना रुग्णालयात नेण्यात येईल.(Latest Marathi News)

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार अडकलेल्या 41 कामगारांच्या नातेवाईकांना तयार राहण्यास सांगण्यात आले आहे. कामगारांचे कपडे आणि बॅग तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे. कामगारांना बाहेर काढल्यानंतर चिन्यालिसौर रुग्णालयात नेण्यात येईल.

Uttarkashi Tunnel Rescue
Uttarkashi Tunnel Rescue: मशीनपेक्षा वेगाने होतंय हाताने खोदकाम; बोगद्यातील मॅन्युअल ड्रिलिंगचा व्हिडिओ आला समोर

52 मीटर पाईप टाकण्यात आले

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी माहिती देताना सांगितले की, 52 मीटर पाईप टाकण्यात आले आहेत. 57 मीटर अंतरापर्यंत पाईप टाकायचे आहेत. हा ढिगारा 10 मीटरपर्यंत खणावा लागेल असे त्यांनी सांगितले. 4-5 मीटर खोदकाम झाले आहे. पाईपही टाकण्यात आले आहेत. तज्ज्ञ मजुरांची टीम रॅट-होल मायनिंग तंत्राचा वापर करून हाताने मलबा हटवत आहेत. त्यानंतर त्यात 800 मिमी व्यासाचे पाइप टाकण्यात येत आहेत. (Marathi Tajya Batmya)

रैट होल माइनर्सनी 4-5 मीटर खोदले आहे. आता केवळ 7-8 मीटर खोदकाम शिल्लक असल्याचे मानले जात आहे. उत्खनन पूर्ण झाल्यानंतर त्यात 800 मिमी व्यासाचा पाइप टाकण्यात येणार आहे. यातूनच कामगार बाहेर पडतील.

Uttarkashi Tunnel Rescue
Uttarkashi Tunnel Rescue : बोगद्यात अडकलेल्या मजूरांचं मानसिक आरोग्य तपासणार स्वदेशी 'रोबो', मिलिंद राज यांची माहिती

यंत्रे निकामी, आता मानवाच्या मदतीने बचाव मोहीम

बोगद्यात सुमारे ६० मीटर अंतरावर कामगार अडकले आहेत. ऑगर मशीनने 48 मीटरपर्यंत ड्रिल केले होते. यानंतर मशीन बोगद्यात अडकली. मशीन कापून बाहेर काढण्यात आली. यानंतर रैट होल माइनर्सनी हाताने खोदकाम सुरू केले. सोमवारपासून चार-पाच मीटर खोदकाम करण्यात आले आहे. अशा स्थितीत आता केवळ 7-8 मीटर खोदकाम शिल्लक असल्याचे मानले जात आहे.

दुसरीकडे मॅन्युअल हॉरिझॉन्टल ड्रिलिंगसाठी दोन खासगी कंपन्यांची दोन टीम तैनात करण्यात आली आहे. एका टीममध्ये 5 तज्ज्ञ आहेत, तर दुसऱ्या टीममध्ये 7 आहेत. या 12 सदस्यांची अनेक टीममध्ये विभागणी करण्यात आली आहे. हे पथक उर्वरित मलबा बाहेर काढतील. यानंतर 800 मिमी व्यासाचा पाइप टाकला जाईल. याच्या मदतीने एनडीआरएफची टीम कामगारांना बाहेर काढणार आहे.

Uttarkashi Tunnel Rescue
Uttarkashi Tunnel Rescue: उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांची सुटका कधी? आधी यंत्र तुटले, आता हवामानाचा फटका..

रैट होल मायनिंग म्हणजे काय?

सिल्क्यारा बोगद्यातील उर्वरित आडवे उत्खनन हाताने केले जात आहे. यामध्ये बोगदा बनवण्यात विशेष कौशल्य असलेल्या व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. त्यांना रॅट-होल मायनर्स म्हणतात. रॅट-होल मायनिंग अतिशय अरुंद बोगद्यांमध्ये केले जाते. कोळसा काढण्यासाठी खाण कामगार शेकडो फूट आडव्या बोगद्यातून खाली उतरतात. विशेषतः मेघालयात आव्हानात्मक भागात कोळसा काढण्यासाठी याचा वापर केला जातो.

- 2014 मध्ये नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने कामगारांच्या सुरक्षेला लक्षात घेऊन त्यावर बंदी घातली होती. एनजीटीने बंदी घातल्यानंतरही बेकायदेशीर रॅट-होल उत्खनन सुरूच आहे.

- उत्तराखंड सरकारचे नोडल ऑफिसर नीरज खैरवाल यांनी स्पष्ट केले की, रेस्क्यू साईटवर आणलेले लोक हे रैट माइनर्स नसून या तंत्रातील तज्ञ आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.