Uttarkashi Tunnel Rescue: बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या चाचण्या पूर्ण; बहुतांश फिट पण...

सिल्क्यारा बोगद्यात अडकून पडलेल्या ४१ कामगारांना १७ दिवसांनंतर सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे.
Uttarkashi Tunnel Rescue
Uttarkashi Tunnel RescueEsakal
Updated on

नवी दिल्ली : सिल्क्यारा बोगद्यात अडकून पडलेल्या ४१ कामगारांना १७ दिवसांनंतर सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. बाहेर आल्यानंतर त्यांना पहिल्यांदा ऋषिकेश इथल्या एम्स रुग्णालयात वैद्यकीय चाचण्यांसाठी दाखल करण्यात आलं होतं.

यांपैकी ४० जणांच्या चाचण्या झाल्या असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त एका कामगाराच्या काही अतिरिक्त चाचण्या केल्या जात आहेत. (Uttarkashi Tunnel Rescue workers medical treatment completed Find out how many have been discharged)

Uttarkashi Tunnel Rescue
पन्नू हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमेरिकेच्या कारवाईवर भारताचं मोठं वक्तव्य! म्हटलं, हे कृत्य म्हणजे...

एम्सचे वैद्यकीय अधिकारी प्रा. आरबी कालिया, प्रा. रविकांत आणि डॉ. नरेंद्र कुमार यांनी सांगितलं की, सिल्क्यारा बोगद्यातून बाहेर काढण्यात आलेले ४१ कामगारांना बुधवारी एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. प्राथमिक तपासणीत कोणालाही जखम झालेली किंवा इतर दुखणं आढळून आलेलं नाही. तसेच सर्वांचे संपूर्ण बॉडीचेकअप करण्यात आलं आहे. (Marathi Tajya Batmya)

Uttarkashi Tunnel Rescue
Coca Cola: 'कोका कोला'ची महाराष्ट्रातील पहिली फॅक्टरी कोकणात उभी राहणार; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

या तपासण्यांमध्ये त्यांचं रक्त, किडनी, ईसीजी, एबीजी, लिव्हर फंक्शन टेस्ट, एक्स रे, इकोकार्डियोग्राफी या चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांचे रिपोर्टही आले असून यामध्ये सर्वजण नॉर्मल आहेत. त्यामुळं एकाला सोडून सर्व ४० जणांना एम्सच्या डॉक्टरांकडून डिस्चार्जसाठी क्लिअरन्स देण्यात आला. त्यामुळं ज्या राज्यातील हे कामगार होते त्यांच्या राज्यांनाही याबाबत कळवण्यात आलं आहे. तसेच एका कामगाराच्या अतिरिक्त वैद्यकीय चाचण्या केल्या जाणार आहेत. (Latest Marathi News)

Uttarkashi Tunnel Rescue
Joshimath: धोकादायक 'जोशीमठ'च्या पुनर्रचनेसाठी केंद्राची मोठी घोषणा; मंजूर केला तगडा प्लॅन

कोणत्या राज्याचे किती कामगार?

बोगद्यात अडकेल्या ४१ कामगारांपैकी झारखंडचे सर्वाधिक १५ कामगार, उत्तर प्रदेशचे ८, बिहारचे ५, ओरिसाचे ५, पश्चिम बंगालचे ३, उत्तराखंडचे २, आसामचे २ आणि हिमाचल प्रदेशातील १ होते. दोन आठवड्यांनंतर त्यांना पुन्हा चेकअपसाठी बोलवण्यात आलं आहे. तसेच टेलिमेडिसनच्या माध्यमातून या कामगारांच्या संपर्कात वैद्यकीय टीम राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.