Uttarakhand Tunnel Rescue: बोगद्यातील मजूरांच्या सुटकेला लागणार आणखी वेळ; ड्रिलिंगचं काम तात्पुरतं थांबलं! आता दिल्लीवरुन येणार तज्ज्ञांचं पथक

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात निर्माणाधीन सिल्कयारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्यासाठी विविध यंत्रणांचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे
Uttarakhand Tunnel Rescue
Uttarakhand Tunnel RescueEsakal
Updated on

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात निर्माणाधीन सिल्कयारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्यासाठी विविध यंत्रणांचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली असून डॉक्टरांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.

उत्तरकाशीच्या सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांसाठी गुरुवार हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. कामगारांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या बचाव मोहिमेदरम्यान आज चांगली बातमी येऊ शकते. बोगद्यात 51 मीटरपर्यंत खोदकाम करण्यात आले आहे. आता कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी केवळ 12 मीटरचे अंतर उरले आहे. अशा परिस्थितीत कामगार लवकरच त्यातून बाहेर पडतील, अशी आशा आहे. दरम्यान, बोगदा खोदणाऱ्या अमेरिकन ऑगर मशीनमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर येत आहे.

Uttarakhand Tunnel Rescue
Tunnel Collapsed: बचाव मोहिम अंतिम टप्प्यात! 21 जवानांच्या टीमचा बोगद्यात प्रवेश; घटनास्थळी 30 रुग्णवाहिकांची व्यवस्था

बचावकार्यात अडथळा आल्याने कामगारांना बाहेर काढण्यासाठी आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे. दरम्यान तोडगा काढण्यासाठी दिल्लीहून हेलिकॉप्टरद्वारे 7 तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं असून तांत्रिक बिघाड दूर करुन कोणत्याही परिस्थिती आजच बचावकार्य पूर्ण केलं जाईल, असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

800 मिमी व्यासाचे पाईप्स ऑगर मशीनच्या सहाय्याने टाकण्याचे बचाव कार्य बोगद्याच्या ढिगाऱ्याच्या भागामध्ये घुसण्याच्या जवळ आले आहे. बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत 800 मिमी व्यासाचे आठ पाईप सुमारे 48 मीटरपर्यंत टाकण्यात आले होते. बोगद्याच्या आत ज्या वेगाने बचावकार्य सुरू होते, त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बचावकार्य पूर्ण होऊ शकेल, असा अंदाज होता. बोगद्याच्या बाहेर वैद्यकीय पथक आणि रुग्णवाहिका तैनात करण्यात आली आहे. बोगद्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधलेल्या मंदिरात प्रार्थना केली जात आहे.

Uttarakhand Tunnel Rescue
RBI: मान्सून, कृषी क्षेत्र, महागाई आणि बँकांवर RBI गव्हर्नर यांचे मोठे वक्तव्य, काय म्हणाले?

कटरचे सामान हेलिकॉप्टरने सायलना हेलिपॅडवर आणण्यात आले आहे. पाईपच्या पुढे ड्रिलिंग करण्यात सध्या अडथळा येत आहे. काही वेळात तज्ज्ञांची टीम येईल. केंद्रीय मंत्री व्ही के सिंह उत्तरकाशीला येणार आहेत. मंत्री दिल्लीहून तंत्रज्ञ टीमसह येथे पोहोचतील. काही काळ बचावकार्य थांबवण्यात आले आहे.

१२ नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या दिवशी ही घटना घडली आहे. तेव्हापासून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी बोगद्यात जाऊन मजुरांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मुख्यमंत्री पुष्कर धामी यांना फोन करून मदत आणि बचाव कार्याची माहिती घेतली. तसेच कामगारांना पुरविण्यात येणाऱ्या अन्न, औषधी व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा याबाबत माहिती घेतली.

Uttarakhand Tunnel Rescue
MIM: 'कोणी माय का लाल मला..' भर सभेत अकबरुद्दीन ओवैसींची पोलिसांना धमकी, FIR दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.