यमुनोत्री हायवेवर अपघात, बोलेरो दरीत कोसळली; महाराष्ट्रातील 3 भाविकांचा मृत्यू

पोलिस आणि राज्य आपत्ती दलाच्या पथकाने शोध आणि बचाव कार्य राबवले आहे.
accident
accidentgoogle
Updated on
Summary

पोलिस आणि राज्य आपत्ती दलाच्या पथकाने शोध आणि बचाव कार्य राबवले आहे.

उत्तरकाशीमध्ये (Uttarkashi) यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर एक अपघाताची घटना घडली आहे. ओझरी ते सायना चाटी (syana chatti) दरम्यान महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या बोलेरो वाहनाचा अपघात झाला. यामध्ये चालकासह तिघे जागीच ठार झाले आहेत. या घटनेत मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहेत. एकूण दहा प्रवासी जखमी झाले असून जखमींना दरीतून बाहेर काढण्यात आले आहे. (Yamunotri Highway Accident Of Bullero)

घडलेली घटना अशी की, उत्तरकाशीमध्ये यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची घटना घडली आहे. या घटनेते महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या बोलेरोला अपघात झाला आहे. यात तीनजण जागीच ठार झाले असून दहा प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. दरम्यान, अपघातस्थळी रुग्णवाहिका दाखल झाली असून जखमींवर घटनास्थळी प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर जखमींना सामुदायिक आरोग्य केंद्र बरकोट आणि नौगाव येथे दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

accident
काश्मीरमधील TV अभिनेत्रीची हत्या करणाऱ्या दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा

पोलिस आणि राज्य आपत्ती दलाच्या पथकाने शोध आणि बचाव कार्य राबवले आहे. यामध्ये चार लहान मुलांसह दहा जखमी प्रवाशांना खोल दरीतून बाहेर काढण्यात यश आले आहे. ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी रस्ता अरुंद असून सुरक्षा व्यवस्था नव्हती. यमुनोत्री येथे झालेल्या दुर्घटनेत एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये चालकाचाही समावेश आहे. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. जखमींमध्ये चार मुलांचाही समावेश आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी शालिनी नेगी यांनी दिली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील 12 प्रवाशांना घेऊन बोलेरो वाहन गुरुवारी सायंकाळी उशिरा जानकीछत्ती येथून बरकोटकडे रवाना झाले. रात्री उशिरा हे वाहन यमुनोत्री धामपासून 28 किमी अंतरावर असलेल्या ओझरीजवळ पोहोचले. बसला साईड देताना हा अपघात झाला. येथे चालकाने बसला साईड देण्यासाठी बोलेरो बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बोलेरो थेट खोल दरीत कोसळली आहे.

accident
राहुल गांधी यांना परदेश दौऱ्यासाठी परवानगीची गरज नाही; काँग्रेसकडून खुलासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.