१५ ते १८ वयोगटासाठी लसीकरण; केंद्राने राज्यांना दिले पुढील निर्देश

१ जानेवारीपासून कोविन पोर्टलवर अँटी-कोविड-१९ लसीकरणासाठी नोंदणी करू शकतील
Corona Vaccine
Corona VaccineCorona Vaccine
Updated on

लसीकरण (Vaccination) करताना कोणताही गोंधळ टाळण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना विशेषतः: १५ ते १८ वयोगटासाठी काही समर्पित कोविड लसीकरण केंद्र तयार करण्यास सांगितले आहे. लसीकरणाच्या पुढील टप्प्याच्या रोलआउटचा आढावा घेण्यासाठी केंद्राने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत आभासी कार्यशाळा आयोजित (Center gave instructions to the states) केली होती. (Center gave instructions to the states)

ज्या कोविड लसीकरण केंद्रांची लसीकरणासाठी (Vaccination) स्थापना करण्यात आली आहे. तेथे १५ ते १८ वयोगटातील बालकांना लस देण्याची व्यवस्था आहे. अशा ठिकाणी एक स्वतंत्र लसीकरणाची जागा (Independent vaccination site) असावी. तसेच राज्यांनी १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी वेगळी रांग करावी आणि स्वतंत्र लसीकरण पथक असावे याची खात्री करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण (Rajesh Bhushan) यांनी सांगितले.

Corona Vaccine
‘पोलिसांच्या कारवाईला नव्हे तर एनसीबीच्या कारवाईला प्रसिद्धी मिळते’

लसीकरणासंबंधी सर्व आधीच स्थापित प्रोटोकॉल १५ ते १८ वयोगटात पाळले पाहिजे. १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांनी अर्धा तास प्रतीक्षा करावी लागेल आणि AEFI चे परीक्षण करावे लागेल. तसेच त्यांना २८ दिवसांनंतर दुसरा डोस (Second dose after 28 days) देण्यात येईल, असेही आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत प्रकाशनानुसार, भूषण (Rajesh Bhushan) यांनी राज्यांना सांगितले.

‘कोव्हॅक्सीन’ हाच लसीचा पर्याय

१५ ते १८ वयोगटातील मुले १ जानेवारीपासून कोविन पोर्टलवर अँटी-कोविड-१९ लसीकरणासाठी नोंदणी करू शकतील. त्यांच्यासाठी ‘कोव्हॅक्सीन’ हाच लसीचा पर्याय असेल. तीन जानेवारीपासून मुलांचे कोविड-१९ विरोधी लसीकरण (Vaccination) सुरू करण्याची तयारी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.