भारतीय व्हेरियंटवर लस, कोरोनावरील उपचार प्रभावी; WHOचा निर्वाळा

WHOचे भारतातील प्रतिनिधी डॉ. रोडेरिको एच. ऑफरिन यांनी याला दुजोरा दिला आहे.
Coronavirus
Coronavirus file photo
Updated on

नवी दिल्ली : भारतात आढळून आलेला कोरोनाचा B.1.617 हा व्हेरियंट १५ पट अधिक संक्रमणकारी असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे हा भारतीय व्हेरियंट धोकादायक असल्याचं जागतीक आरोग्य संघटनेनं (WHO) मान्य केलं आहे. पण त्याचबरोबर या भारतीय व्हेरियंटविरोधात लस आणि कोरोनाच्या रुग्णांवर होत असलेले उपचार प्रभावी आहेत, असा दावाही WHOचे भारतातील प्रतिनिधी डॉ. रोडेरिको एच. ऑफरिन यांनी केला आहे. (Vaccine and treatment on corona is effective on Indian variant says WHO)

Coronavirus
तुम्ही कोरोना लढ्याला कमजोर करताय?; नड्डांचा सोनिया गांधींवर पलटवार

काही दिवसांपूर्वी WHOनं म्हटलं होतं की, कोरोनाचा B.1.617 हा व्हेरियंट पहिल्यांदा डिसेंबर महिन्यात आढळून आला होता. हा व्हेरियंट कोरोनाच्या मूळ रुपातील विषाणूच्या तुलनेत अधिक वेगानं आणि सहजतेने पसरत आहे. कोरोनावर काम करत असलेल्या WHO च्या वैज्ञानिक मारिया वान केरकोव म्हणाल्या, "कोरोनाचा B.1.617 व्हेरियंटचं संक्रमण वेगानं होत असल्याची माहिती उपलब्ध आहे. त्यांनी असंही म्हटलं होतं की, आम्ही याला जागतीक स्तरावरील चिंतेचा विषय म्हणून वर्गिकृत करत आहोत."

आत्तापर्यंत १७ देशांमध्ये आढळून आला हा व्हेरियंट

WHOच्या माहितीप्रमाणं, भारताच्या B.1.617 या व्हेरियंट विषाणूची संक्रमणता खूपच जास्त आहे. भारतात दुसऱ्या लाट वेगानं पसरण्यामागे हाच व्हेरियंट असल्याचं सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच WHOनं सांगितलं होतं की, १७ देशांमध्ये हा व्हेरियंट दिसून आला आहे. वेगानं वाढत्या संक्रमणाच्या कारणामुळे अनेक देशांमध्ये भारतातील प्रवाशांवर बंदी घातली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()