कोव्हॅक्सिनवर ‘डब्लूएचओ’ची मोहोर

इतर देशांकडून लवकर मान्यता मिळण्याची शक्यता
Covaxin
CovaxinSakal
Updated on

नवी दिल्ली : स्वदेशी बनावटीच्या कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीच्या आपत्कालीन उपयोगासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) अखेर मंजुरी दिली आहे.

अशा प्रकारे वैश्विक मान्यता मिळालेली कोव्हॅक्सिन ही पहिली भारतीय लस ठरली आहे. हैदराबादच्या ‘भारत बायोटेक’ने या लसीचे उत्पादन केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या या मान्यतेमुळे कोव्हॅक्सिन लस घेणाऱ्या भारतीयांचा परदेश प्रवासाचा मार्ग सुकर होणार असून आरटीपीसीआर चाचणी अथवा विलगीकरण यासारख्या निर्बंधांना त्यांना तोंड द्यावे लागणार नाही. याआधी ऑस्ट्रेलियाने कोव्हॅक्सिनला मान्यता दिली होती. आता इतर देशांकडूनही या लसीला मान्यता मिळू शकेल.

Covaxin
T20 WC : टीम इंडियाचा धमाका; सेमीच्या पहिल्या पेपरमध्ये पास

अॅस्ट्राझेनेका कंपनीने तयार केलेल्या आणि भारतात सिरम इन्स्टिट्यूटद्वारे उत्पादन झालेल्या कोव्हिशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडून सहजपणे मान्यता मिळाली असली तरी कोव्हॅक्सिनला अद्याप तशी मान्यता मिळाली नव्हती. कोव्हॅक्सिनच्या वापरासाठी भारत बायोटेकने जागतिक आरोग्य संघटनेकडे एप्रिलमध्ये अर्ज केला होता आणि लसीची सुरक्षा, प्रभाव, चाचण्या याबाबतची तपशीलवार माहिती जुलैमध्ये दिली होती. तेव्हापासून या लसीला मान्यतेची प्रतिक्षा होती. अलीकडेच, जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक सल्लागार समितीने कोव्हॅक्सिनचा आपत्कालीन वापरासाठी योग्य लशींच्या यादीत समावेश करण्यासाठी अतिरिक्त माहिती मागविली होती.

‘जी-२०’ मध्येही गाजला मुद्दा

जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरासाठी दिलेल्या मान्यतेनंतर जगभरात कोरोना प्रतिबंधक लशींच्या पुरवठ्यासाठी भारताच्या लस निर्यात मोहिमेलाही वेग येणार आहे. ‘जी-२०’ देशांच्या राष्ट्रप्रमुखांसमोर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताने पुढील वर्षी ५ अब्ज डोस उत्पादनाचे नियोजन केले असल्याचे जाहीर केले होते. तसेच या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा सुरळीत राहावा म्हणून प्रगत देशांनाही आवाहन केले होते.

Covaxin
पुणे : संरक्षक ग्रीलला धडकून मुलाचा जागीच मृत्यू

वापर कालावधी वर्षभराचा

कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीच्या वापराची कालमर्यादा देखील वाढविण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सेल्फ ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन या संस्थेने (सीडीएससीओ) कोव्हॅक्सिनची वापर कालावधी मर्यादा १२ महिन्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच अर्थ ही लस उत्पादन झाल्याच्या दिवसापासून एक वर्षापर्यंत वापरासाठी उपयुक्त असेल. हा कालावधी वाढविण्याची विनंती भारत बायोटेकतर्फे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.