देशात दोन महिन्यात मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होईल : AIIMS

Vaccination
Vaccination esakal
Updated on
Summary

कोरोनावर मात करण्यासाठी देशात लसीकरणाचा (Covid 19 vaccine) वेग वाढवण्याची गरज आहे. सध्या देशाला लशीच्या तुटवड्याचाही सामना करावा लागत आहे.

नवी दिल्ली - भारतात (India) कोरोनाचा संसर्ग गेल्या महिन्याभरात जास्त वाढला आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर एकाच दिवशी चार लाख नव्या रुग्णांचा आणि 4 हजार मृत्यूचा उच्चांकही गाठला होता. त्यानंतर आता हळू हळू नवीन रुग्ण कमी होत असून कोरोनामुक्तांची (Coronavirus) संख्या वाढली आहे. मात्र असे असले तरी कोरोनावर मात करण्यासाठी देशात लसीकरणाचा (Covid 19 vaccine) वेग वाढवण्याची गरज आहे. सध्या देशाला लशीच्या तुटवड्याचाही सामना करावा लागत आहे. दरम्यान, एम्सचे (AIIMS) संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया (Dr Randeep Guleria) यांनी देशात कोरोनाची लस उपलब्ध होईल असं म्हटलं आहे. गुलेरिया म्हणाले की,''जवळपास दोन महिन्यात मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होईल. लस तयार करणाऱ्या कंपन्या त्यांचे प्लांट सुरु करतील. त्यामुळे लशीचे उत्पादन वाढेल आणि डोस उपलब्ध होतील. आपण बाहेरूनसुद्धा लस मागवू असंही गुलेरिया यांनी सांगितलं. (Vaccines will be available in large amounts in india says AIIMS Director Dr Randeep Guleria)

एम्सचे संचालक गुलेरिया यांनी सांगितलं की, भारतात कोविशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक लशीची निर्मिती जास्ती जास्त प्लांटमधून करण्यात येईल. स्पुटनिकने अनेक कंपन्यांसोबत करार केला आहे. भारतात कंपन्यांच्या निर्मितीसाठी नवीन प्लांट भारत बायोटेक आणि सीरमकडून उभारले जात आहे. जुलै ते ऑगस्ट दरम्यान आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर लशीचे डोस उपलब्ध होतील असा विश्वास गुलेरिया यांनी व्यक्त केला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 18 ते 44 वयोगटातील 42 लाखांहून अधिक लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे.

सर्वांना लसीकरण करणं हे एक-दोन किंवा महिन्याभरात होणारी गोष्ट नाही. यासाठी एक रणनिती ठरवण्याची गरज आहे. तरुणांना 2,3 किंवा चार महिन्यांनी अपॉइंटमेंट देण्याचं नियोजन करायला हवं. यानुसार जास्तीत जास्त लोकांना लस देता येईल असंही गुलेरिया यांनी म्हटलं.

Vaccination
PM मोदींविरोधात पोस्टरबाजी,9 जणांना अटक
Vaccination
भारतातील कोरोना स्थिती चिंताजनक - WHO प्रमुख

देशात सध्या सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस उपलब्ध आहे. या दोन्ही लशींचे लसीकरण देशात सुरु असून यामध्ये रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीचाही समावेश झाला आहे. जगात सर्वात आधी कोरोनावर ही लस आली आहे. भारतात रशियाने तयार केलेली स्फुटनिक- व्ही लस देण्यात येणार असून त्याचा पहिला डोस हैदराबादमध्ये शुक्रवारी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.