Valentines Day 2023 :  महात्मा गांधींचाही पाय घसरला होता; लग्नानंतर पडले होते या महिलेच्या प्रेमात!

गांधीजींना त्या बंगाली महिलेला त्यांच्या देशाच्या दौऱ्यात पुन्हा भेटण्याची संधी मिळाली
Valentines Day 2023 :  महात्मा गांधींचाही पाय घसरला होता; लग्नानंतर पडले होते या महिलेच्या प्रेमात!
Updated on

महात्मा गांधी अर्थात आपल्या सर्वांचे बापूजी. त्यांच्या वैयक्तिक जीवनात अनेक महिलांशी त्यांचा संपर्क आला. कधी त्यांच्या सहकारी होत्या तर काही त्यांनी मुलीप्रमाणे मानलेल्या होत्या. पण, यात एक महिला सर्वात वेगळी होती. कारण, त्या महिलेवर गांधीजींचे प्रेम जडले होते. कोण होती ती आणि काय होते त्यांचे नाते.

1901ची गोष्ट. जेव्हा महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून काँग्रेसच्या अधिवेशनात भाग घेण्यासाठी भारतात आले. आपल्या राजकीय भूमीचा शोध घेण्यासाठी ते भारतात आले होते, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी एका तरुणीला गीत गाताना ऐकले. ती विलक्षण सुंदर होती. तिची काया, तिची देहबोली जणू ती एक बंगाली अप्सरा होती. तिच्या याच रूपाची फ्रेम गांधीजींच्या मनात अगदी फिट बसली. तिचे नाव होते सरला देवी चौधरी.

Valentines Day 2023 :  महात्मा गांधींचाही पाय घसरला होता; लग्नानंतर पडले होते या महिलेच्या प्रेमात!
Rose Day Special Story: नातं हे कधीही गुलाबासारखं आकर्षक आणि मोगऱ्यासारखं मोहक असावं!

1915 मध्ये जेव्हा गांधीजी भारतात परतले. तेव्हा ते आपल्या आश्रित देशाला कायमस्वरूपी स्वतंत्र करण्यासाठी लढा देण्याचा विचार करून परतले. 1917 पर्यंत देशात गांधीजींची ओळख निर्माण झाली होती. दोन वर्षांनंतर त्यांच्या असहकार आंदोलनाला देशभरातून अभूतपूर्व पाठिंबा मिळाला. दरम्यान, गांधीजींना त्या बंगाली महिलेला त्यांच्या देशाच्या दौऱ्यात पुन्हा भेटण्याची संधी मिळाली. पण, ऑक्टोबर 1919 मध्ये जेव्हा लाहोरमध्ये सरला देवी चौधरी यांच्या घरी राहिल्यावर ते तिच्या प्रेमात पडले. सरला तेव्हा 47 वर्षांच्या होत्या तर गांधीजी 50 वर्षांचे होते.

Valentines Day 2023 :  महात्मा गांधींचाही पाय घसरला होता; लग्नानंतर पडले होते या महिलेच्या प्रेमात!
Valentine Week : व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी ऑफीसमधून सुट्टी मिळत नाही? या ट्रिक्स ट्राय करा

सरला देवी या रवींद्रनाथ टागोर यांच्या मोठ्या बहिणीच्या कन्या होत्या. सरला यांचे पती चौधरी रामभुज दत्त स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याबद्दल तुरुंगात होते. त्याचकाळात गांधीजींना सरला यांच्या घरी राहण्याचा योग आला. ते खरच सरला देवींच्या प्रेमात पडले होते.

गांधीजी आणि कस्तुरबा यांचे लग्न वयाच्या १२ व्या वर्षी झाले होते. त्यामूळे नक्कीच त्यांना गांधीजींचे प्रेम खटकणारे होते. त्यावर त्यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली होती. गांधीजींचे लग्न तुटेल असे वाटत नसताना त्यांच्या वैवाहिक जीवनात भुकंप झाला.

Valentines Day 2023 :  महात्मा गांधींचाही पाय घसरला होता; लग्नानंतर पडले होते या महिलेच्या प्रेमात!
Valentine Day Shikhar Dhawan : नशिबात नाही परी तर... शिखरचा व्हॅलेंटाईन स्पेशल VIDEO होतोय व्हायरल

गांधीजींच्या या प्रेमाला त्यांच्या मुलांनी जोरदार विरोध केला. एकंदरीत हे प्रकरण मोठा गाजावाजा करणारे ठरले. त्यामूळेच गांधीजींनी त्यापासून स्वतःला दूर केले.

लाहोरमध्ये सरला यांच्या घरी गांधीजींच्या वास्तव्यादरम्यान लोकांना सार्वजनिक ठिकाणीही त्यांची जवळीक जाणवली. तसेच, भाषणातही सरला यांचा उल्लेख गांधीजींनी केला, असा उल्लेख त्यांचे नातू राजमोहन गांधी यांनी पुस्तकात केला आहे.

Valentines Day 2023 :  महात्मा गांधींचाही पाय घसरला होता; लग्नानंतर पडले होते या महिलेच्या प्रेमात!
Valentines Day 2023 : प्रियसीच्या ‘त्या’ चुकीमुळे मिर्झा-साहिबा यांचे प्रेम अमर झाले!  

गांधीजींचे नातू राजमोहन गांधी यांचे महात्मा गांधींचे चरित्र लिहिले नव्हते. तोवर या प्रकरणाला केवळ अफवा मानले जायचे. पण, पुस्तकातून सर्वांसमोर आणणारे ते पहिले व्यक्ती होते.

गांधीजींचे सरला यांच्यासाठीची पत्रे

सरला सोबतचा काळ खूप छान व्यतित झाला. तीची सोबत जिव्हाळ्याची आणि चांगली होती. तिने माझी खूप काळजी घेतली. प्रेमात पडल्यानंतर काही महिन्यातच आमच्या दोघांचे नाते आध्यात्मिक विवाहासारखे असल्याचे वाटू लागले, असे गांधीजी एका पत्रात म्हणतात. एका दुसऱ्या पत्रात गांधीजी म्हणतात की, अनेकवेळा माझ्या स्वप्नात ती आली आहे. मला सतत तिची स्वप्ने पडतात.

Valentines Day 2023 :  महात्मा गांधींचाही पाय घसरला होता; लग्नानंतर पडले होते या महिलेच्या प्रेमात!
Valentine Day : संस्कार प्रेमाचा

असा झाला नात्याचा शेवट

1920 मध्ये जेव्हा सरलादेवींच्या बाबतीत घरची परिस्थिती बिकट होऊ लागली तेव्हा गांधीजींनी थांबण्याचा निर्णय घेतला.कारण, घरच्या इतर सदस्यांसोबत त्यांचे संबंध बिघडत चालले होते. कौटुंबिक कहल वाढत होता, त्यामूळे १९२० मध्ये त्यांनी हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला. या दोघांनीही त्यांच्या आत्मचरित्रात एकमेकांचा उल्लेख कटाक्षाणे टाळला आहे. पण, असे असले तरी त्यांचे नाते कोणीही नाकारू शकणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.