Vande Bharat train Video: वंदे भारत ट्रेनचा घातपात करण्याचा कट; लोको पायलटने आपात्कालीन ब्रेक मारल्याने अनर्थ टळला

Vande Bharat train Video:
Vande Bharat train Video:
Updated on

नवी दिल्ली- राजस्थानमध्ये वंदे भारत ट्रेनला घातपात करण्याचा प्रयत्न झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रुळावरुन ट्रेनला उतरवण्यासाठी रुळावर दगडं आणि लोखंडाच्या वस्तू ठेवण्यात आल्या. जेणेकरुन ट्रेन रुळावरुन उतरावी. यासंदर्भात व्हायरल करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये रुळावर दगडं आणि लोखंडी वस्तू ठेवल्याचं दिसत आहे.

रुळावर दगडांचा ढिग करण्यात आल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. माहितीनुसार, उदयपूर-जयपूर वंदे भारत ट्रेन मार्गावरुन जाण्याआधी रुळावर दगडं आणि लोंखडी वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. पण, लोकोपायलटच्या हे लक्षात आल्यामुळे मोठी दुर्घटना टाळता आली. रुळावरील दगडं आणि लोखंडी वस्तू काढण्यात आल्या. त्यानंतर वंदे भारत ट्रेन पुढे गेली.

Vande Bharat train Video:
Sakal Podcast : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतावर पदकांचा वर्षाव ते PM मोदींनी लाँच केल्या नऊ वंदे भारत ट्रेन

२४ सप्टेंबर रोजीच जयपूर-उदयपूर वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फ्रेन्सद्वारे वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता. राजस्थानची ही तिसरी वंदे भारत ट्रेन आहे.

Vande Bharat train Video:
Vande Bharat Train : वंदे भारत ट्रेनची अवघ्या १४ मिनिटात स्वच्छता!

भारतीय रेल्वेकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण, उत्तर पश्चिम रेल्वे आरपीएफने यासदर्भात कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे. काही लोकांनी हा व्हिडिओ शेअर करत रेल्वेकडे तक्रार केली आहे. याप्रकरणी तपास केला जाणार असल्याचं बोललं जातंय. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.