Vande Metro: आता 'हायड्रोजन पावर'वर धावणार ट्रेन्स; जाणून घ्या 'वंदे मेट्रो'चा मास्टर प्लॅन?

लांब पल्ल्याच्या मार्गावर देखील लवकरच वंदे भारत ट्रेन्स सुरु होणार आहेत.
Vande Bharat Train
Vande Bharat Trainsakal
Updated on

नवी दिल्ली : भारतात आता हायड्रोजन पावरवर रेल्वे धावणार आहे. हायड्रोजनवर चालणारी ही वंदे मेट्रो ट्रेन पुढील वर्षात सुरु होईल, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. ही ट्रेन देशातील पहिली स्वदेशी हायड्रोजन ट्रेन असणार आहे, जी डिसेंबर २०२३ मध्ये धावणार आहे, असंही मंत्री वैष्णव यांनी सांगितलं आहे. (Vande Metro Train Now trains will run on Hydrogen Power Know the master plan)

Vande Bharat Train
Winter Session: उद्धव ठाकरे नागपूरकडे रवाना; CMपदावरुन पायउतार झाल्यानंतर अधिवेशनात लावणार हजेरी

प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेता रेल्वेच्यावतीनं वंदे मेट्रो तयार करण्यात येत आहे. सन १९५० आणि १९६० च्या दशकात डिझाईन करण्यात आलेल्या ट्रेन्सची जागा घेणार आहे. याची माहिती रेल्वे आणि संचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी हे देखील म्हटलंय की, स्वदेशी रुपात डिझाईन आणि निर्माण करण्यात आलेली हायड्रोजन ट्रेन डिसेंबर २०२३ मध्ये धावणार आहे.

Vande Bharat Train
Karnataka Border Dispute : 'करेक्ट कार्यक्रम' करून जा; जयंत पाटलांनी इलॉन मस्कलाच वादात ओढलं

वैष्णव म्हणाले, आम्ही वंदे मेट्रो ट्रेनचं डिझाईन तयार करत आहोत हे डिझाईन मे किंवा जूनपर्यंत तयार होईल. जागतीक स्तरावर आम्ही हे वंदे मेट्रोचं डिझाईन तयार करत आहोत जी मोठी झेप असेल. या वंदे मेट्रो ट्रेन्सची निर्मिती इतक्या मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे की, देशभरात १९५० आणि १९६० च्या दशकात डिझाईन करण्यात आलेल्या सर्व ट्रेन्स बदलण्यात येतील.

हे ही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

गरीबांकडं सरकारचं लक्ष

मंत्र्यांनी असंही सांगितलं की, वंदे मेट्रो ट्रेन मध्यम वर्ग आणि गरीब वर्गातील लोकांची काळजी घेणारी असेल. याचा फोकस श्रीमंत प्रवाशांसाठी असणार नाही कारण श्रीमंत लोक आपली व्यवस्था करु शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार मध्यम आणि खालच्या वर्गातील लोकांवर विशेष ध्यान केंद्रीत करत आहे. जे खर्च करण्यास सक्षम नसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.