पोलिसांना म्हणाला; मी कोण आहे दाखवतोच...

varanasi ssp asked for id during checking electricity worker gave introduction by power cut of area
varanasi ssp asked for id during checking electricity worker gave introduction by power cut of area
Updated on

लखनौ (उत्तर प्रदेश): देशात लॉकडाऊन असल्यामुळे रात्री फिरणाऱयांवर पोलिस कारवाई करतात. पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान एकाला थांबवून ओळखपत्राची मागणी केली. पण, वीज उपकेंद्रात काम करत असलेल्या व्यक्तीकडे ओळखपत्र नव्हते. पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलताच त्याने मी कोण आहे दाखवतोच असे सांगून सहकाऱयाला वीज बंद करण्यास सांगितली. यामुळे परिसरातील चार मिनिटे वीज बंद होती. वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे दोघांना नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याची घटना येथे घडली.

वाराणसी येथे घडलेल्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. शहरातील लंका पोलिस चौकीच्या हद्दीमध्ये नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी वाराणसीचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अमित पाठक हे वाहनांची तपासणी करत होते. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास वीज विभागामध्ये काम करणारा कर्मचारी संजय सिंह याला पोलिसांनी अडवले. ओळखपत्राची मागणी केल्यानंतर संजयने आपण वीज विभागामध्ये काम करत असल्याचे सांगितले. मात्र, संजयकडे ओळखपत्राबद्दल नव्हते. यावरुन पोलिस आणि संजयमध्ये वाद सुरू झाला. याबद्दल वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनी मध्यस्थी केली. पण, संजयला ओखळपत्र दाखवावे लागेल, असे सांगितले. यामुळे संजय चिडला आणि मी कोण आहे दाखवतोच असे म्हणाला. संजयने करौंदी वीज उपकेंद्रामध्ये फोन केला आणि रात्री दोन वाजून १३ मिनिटांनी नाकाबंदी करण्यात आलेल्या परिसरातील वीजपुरवठा खंडीत करण्यास सांगितला. घडलेला प्रकार पाहून पोलिस कर्मचाऱ्यांबरोबर अधिकारीही गोंधळून गेले. चार मिनिटांपर्यंत हा पूर्ण परिसर अंधारात होता. त्यानंतर दोन वाजून १७ मिनिटांनी संजयने परत फोन करुन वीजपुरवठा सुरू करण्यास सांगितले.

दरम्यान, पोलिस अधिकाऱयांनी संजयची तक्रार पूर्वांचल विद्युत वितरण निगमच्या व्यवस्थापकीय अध्यक्षांकडे केली. या प्रकरणामध्ये चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीनंतर संजय आणि रामलखनला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. शिवाय, संजय आणि रामलखनविरोधात लंका पोलिस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.