Ukraine : वरुण गांधींचा घरचा अहेर; सरकारला करून दिली आठवण

Varun Gandhi And Narendra Modi
Varun Gandhi And Narendra Modiesakal
Updated on

भाजप खासदार वरुण गांधी यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मुलीने दावा केला आहे की, इतर देशांनी त्यांच्या नागरिकांना युक्रेनमधून बाहेर काढले. मात्र, भारत सरकार त्यांच्यासाठी काहीही करत नाही आहे. युक्रेनची राजधानी कीवमध्ये अडकलेल्या एका भारतीय विद्यार्थिनीने भारतीय दूतावासावर फोन उचलत नसल्याचा आरोप केला आहे. यानंतर वरुण गांधी (Varun Gandhi) यांनी सोमवारी पुन्हा एकदा आपल्याच सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

पश्चिम युक्रेनला परत जाण्याच्या भारतीय दूतावासाच्या सल्ल्याचा संदर्भ देत विद्यार्थ्याने सांगितले की, ते सीमेपासून ८०० किमी अंतरावर आहेत आणि अधिकृत मदतीशिवाय इतके अंतर प्रवास करण्याचे कोणतेही साधन नाही. आम्ही भारतीय दूतावासाचे कर्मचारी यांना कॉल करीत आहोत आणि ते आमचे कॉल नाकारत आहे. आम्ही रोमानियन सीमेवरील व्हिडिओ शेअर केले आहेत. जिथे मुलींना अमानुषपणे मारहाण केली जात आहे. आज दुपारी दूतावासाने सांगितले की, ज्यांना ट्रेनने कीवला जाता येते त्यांनी जावे. आम्हाला मार्गदर्शन करण्याऐवजी ते दुर्लक्ष करीत आहेत.

आमच्या सध्याच्या ठिकाणापासून सीमा ८०० किमी दूर आहे. भारत (BJP) सरकार (government) आम्हाला अजिबात मदत करत नाही, असे ते म्हणत आहेत. यानंतर भाजप खासदार वरुण गांधी यांनी सोमवारी या प्रकरणावर केंद्रावर जोरदार हल्ला चढवला. सरकारच्या निष्क्रियतेमुळे १५,००० हून अधिक भारतीय विद्यार्थी (student in trouble) अजूनही युक्रेनमध्ये अडकले आहेत. योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्यामुळे विद्यार्थी अडकले आहेत. ठोस धोरणात्मक आणि मुत्सद्दी कारवाई करून त्यांना परत आणणे आपली जबाबदारी आहे, असेही वरुण गांधी (Varun Gandhi) म्हणाले.

Varun Gandhi And Narendra Modi
राणेनंतर भाजपच्या ‘या’ नेत्याने अपशब्दात मुख्यमंत्र्यांना खडसावले

नागरिकांना मदत करणे हे त्यांचे कर्तव्य

भारतीय दूतावास त्यांच्या मदतीला येत नसल्याचा आरोप करीत कीवमध्ये अडकलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडिओ शेअर करून वरुण गांधी (Varun Gandhi) यांनी मोदी सरकारला आठवण करून दिली की, संकटाच्या वेळी भारतीय नागरिकांना मदत करणे हे त्यांचे कर्तव्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.