Varuna Drone
Varuna Drone

भारतीय नौदलासाठी पुण्यात बनवलं खास प्रवासी ड्रोन; पायलटशिवाय करता येणार प्रवास

Published on

पुणे - पुण्यातील एका स्टार्टअपने देशातील पहिले प्रवासी ड्रोन बनवले आहे. हे विशेष ड्रोन भारतीय नौदलासाठी विकसित करण्यात आले आहे. या ड्रोनची खास गोष्ट म्हणजे पायलट शिवाय हे ड्रोन 130 किलोपर्यंत वजन वाहून नेऊ शकतं. या ड्रोनला 'वरुण' असं नाव देण्यात आलं आहे. (Varuna Drone news in Marathi)

Varuna Drone
WazirX क्रिप्टो एक्सचेंजवर ईडीची कारवाई; 65 कोटींची संपत्ती गोठवली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात 'वरुण' ड्रोनचा परफॉर्मन्स पाहिला होता. शिवाय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने देखील वरुण ड्रोनचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता.

या ड्रोनमध्ये व्यक्तीला केवळ बसायचं असतं. हे ड्रोन त्या व्यक्तीला स्वतःहून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतं.. हे ड्रोन बाहेरून ऑपरेट केले जाते. या ड्रोनमध्ये चार ऑटो पायलट मोड आहेत, ज्यामुळे बिघाड झाली तरी सतत ड्रोन हवेत उडू शकतं.

सागर डिफेन्स इंजिनिअरिंग कंपनीने तयार केलेल्या वरुण ड्रोनमध्ये हवेत असताना तांत्रिक बिघाड झाली तरी सुरक्षितपणे खाली उतरवता येते. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत ड्रोनमधून आपोआप पॅराशूट उघडू शकते. ज्यामुळे सुरक्षित लँडिंग करता येईल. 'वरुण' ड्रोनचा वापर एअर अॅम्ब्युलन्स म्हणून किंवा दुर्गम भागात माल पोहोचवण्यासाठी केला जाऊ शकतो, असे कंपनीच्या सह-संस्थापकांनी म्हटलं आहे.

नौदलाने सागर डिफेन्सला हा प्रकल्प दिला होता. सुमारे दीड वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याची योजना असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. या ड्रोनची जमिनीवर चाचणी घेण्यात आली आहे. ते नौदलाच्या अनेक गरजा पूर्ण करू शकेल असही सांगण्यात आलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.