Vasudev balwant phadke: सशस्त्र क्रांतीचे जनक, ज्यांनी एकट्याने आदिवासींची फौज उभी केली

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून यंदा 75 वर्षे पूर्ण होत आहेत.
Vasudev balwant phadke
Vasudev balwant phadkeEsakal
Updated on

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून यंदा 75 वर्षे पूर्ण होत आहेत.आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाखो लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली हे आपण सर्व जाणतो. पण आजही असे अनेक शूर क्रांतिकारक आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला माहिती नाही. त्यातील वासुदेव बळवंत फडके हे असेच एक अनामिक क्रांतिकारक आहे. आज आम्ही तुम्हाला स्वातंत्र्यसैनिक वासुदेव बळवंत फडके यांच्या आयुष्यातील काही गोष्ट सांगणार आहोत.

कोण होते वासुदेव बळवंत फडके?

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील शिरढोणे गावात 4 नोव्हेंबर 1845 रोजी जन्मलेले वासुदेव बळवंत फडके हे ब्रिटिश सरकारविरुद्ध सशस्त्र बंड पुकारणारे पहिले क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात. 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्याच्या अपयशानंतर स्वातंत्र्याच्या महान युद्धाची पहिली ठिणगी वासुदेव बळवंत फडके यांनीच पेटवली होती. वासुदेवांना सशस्त्र क्रांतीचे जनक म्हटले जाते. कारण गुलामगिरीच्या साखळ्या उखडून टाकण्यासाठी त्यांनी आदिवासी तरुणांची अख्खी फौज उभी केली होती. या सैन्याने इंग्रजांच्या नाकी नऊ आणुन सोडले होते. फडके यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना दुकानात काम करण्यास सांगितले. पण त्यांना हे करायचे नव्हते,त्यामुळे त्यांनी वडिलांचे म्हणणे नाकारून ते थेट मुंबईला निघून गेले.

येथे त्यांनी 1871 मध्ये एका इंग्रजी कंपनीत काम करत असताना जंगलात फौजेच्या सरावाची जागा तयार केली. या काळात ज्योतिबा फुले आणि लोकमान्य टिळक हेही त्यांचे साथीदार होते, असे म्हणतात. फडक्यांनी स्वत:ची फौज उभी करण्यास सुरुवात केली, ज्यात भिल्ल, डांगर, कोळी, रामोशी आदी जातीतील तरुणांचा समावेश होता. वासुदेव यांना सुरुवातीपासूनच कुस्ती आणि घोडेस्वारीची आवड होती.

आईच्या मृत्यूनंतर घेतली देशात पारतंत्र्यातून मुक्त करण्याची प्रतिज्ञा...

आईच्या मृत्यूने फडक्यांच्या आत क्रांतीची ज्योत अधिक प्रज्वलित झाली, असे म्हणतात. असे काहीसे घडले की, वासुदेव मिलिटरी अकाउंट्स विभागात कारकून म्हणून काम करत असताना त्यांना बातमी मिळाली की त्याची आई खूप आजारी आहे आणि आईला बळवंतला तिच्या मृत्यूपूर्वी भेटायचे आहे. आईची ही अवस्था जाणून बळवंतला धक्काच बसला. त्यांनी लगेच तातडीने इंग्रज अधिकाऱ्याकडे सुट्टी मागितली पण त्या अधिकाऱ्याने सुट्टी देण्यास नकार दिला. दुसऱ्याच दिवशी बळवंत रजा न घेता घरी निघून गेला, मात्र घरी पोहोचण्यापूर्वीच त्यांची आई ही जग सोडून गेली. या परिस्थितीमुळे त्यांना पहिल्यांदाच गुलामगिरी काय असते याची जाणीव झाली. यानंतर त्यांनी या गुलामगिरीतून मुक्त होण्याचे व्रत घेतले.

Vasudev balwant phadke
क्रांतिकारक विचारवंत

पुढे त्यांची पुण्यात भेट क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्यासोबत झाल्यानंतर फडके यांच्या मनात त्यांची फौज उभारण्याचा विचार प्रबळ होऊ लागला. साळवे हे समाजसुधारक होते आणि ते दलित तरुणांना कुस्तीचे प्रशिक्षण देत असत. वासुदेवांनी त्यांच्या कडून कुस्तीचे प्रशिक्षण घेतले.

या आदिवासीना घाबरून थरथर कापत होते इंग्रज...

वासुदेव यांनी आदिवासीची फौज संघटित करण्याचा प्रयत्न सुरू केला. 1879 मध्ये इंग्रजांविरुद्ध बंड पुकारण्यात आले. क्रांती करण्यासाठी शस्र हवे होते आणि शस्रांसाठी पैसा गरजेचा होता त्यावेळी मग त्यांनी अनेक ठिकाणी दरोडे पाडणेही सुरू होते. हळूहळू वासुदेव फडके यांचा प्रभाव महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमध्ये पसरला होता. त्याच्या या वाढत्या वलयामुळे इंग्रज अधिकाऱ्यांचा चांगलाच थरकाप उडाला होता.

इंग्रज अधिकाऱ्यांच्या मनात फडके यांच्या विषयी इतकी भीती वाढली होती की फडकेनां पकडून देणाऱ्याला 50,000 रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले. कारण फडके आणि त्यांच्या फौजेने काही दिवसांसाठी पेशव्यांची राजधानी असलेले पुणे शहर ताब्यात घेतले होते. तेव्हा इंग्रज सैन्यही त्यांना तेथून हटवू शकले नाही. ही बातमी इंग्लंडपर्यंत पोहोचली. त्यामुळे त्यांना पकडून देणाऱ्याला इंग्रजांनी मोठी रक्कम जाहीर केली.पण या दरम्यान एक गोष्ट घडली ती म्हणजे, ही रक्कम इंग्रजांनी जाहिर करतांच दुसऱ्याच दिवशी मुंबईच्या रस्त्यांवर फडक्यांच्या स्वाक्षरीच्या जाहिराती दिसल्या, ज्यात इंग्रज अधिकारी रिचर्डला मारणाऱ्याला 75,000 रुपयांचे पूर्ण बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती.

गद्दारामुळे फडके पकडले गेले.

पुढे हैदराबादचे पोलीस आयुक्त निजाम अब्दुल हक आणि ब्रिटीश मेजर डॅनियल फडके यांच्या शोधात भटकत असताना त्यांना एका देशद्रोही व्यक्तीने मदत केली. जे काम इंग्रज व निजाम सैन्य करू शकले नाही ते काम एका गद्दाराने केले. यात फडके यांचे अनेक साथीदार मारले गेले, काही पकडले गेले. या दरम्यान फडके हे पंढरपूरच्या वाटेवरील एका देवी मंदिरात लपून बसले होते पण डॅनियलला एका गद्दार व्यक्तीने फडके तेथे असल्याची माहिती दिली आणि अशा प्रकारे त्याला 20 जुलै 1879 रोजी अटक करण्यात आली.

Vasudev balwant phadke
भारतीय स्वातंत्र्य लढ्यानं अनेक देशांनां प्रेरणा दिली - PM मोदी

अटक केल्यानंतर डॅनियलने फडकेच्या छातीवर बूट ठेवून विचारले, तुला काय हवे आहे, तेव्हा फडके हसून म्हणाले की, 'मला तुझ्याशी एकट्याने तलवारीशी दोन हात करायचे आहेत'.

एका डायरीमुळे गुन्हा सिद्ध झाला.

फडके यांच्या विरोधात न्यायालयात एकही साक्षीदार सापडला नसल्याचे सांगितल्या जाते. त्याच्यावरचा गुन्हा हा फक्त त्याच्या एका डायरी लिहलेल्या गोष्टीमुळे सिद्ध झाला होता. 15 वर्षे लिपिकपदावर राहिल्यानंतर त्यांना हिशेब डायरीत लिहिण्याची सवय लागली, असे सांगितले जाते.त्यामुळे दरोड्या दरम्यान लुटलेल्या पैशांचा संपूर्ण हिशोब ते डायरीतच लिहून ठेवायचे. ती डायरी नेमकी डॅनियलचा हाती लागली. डायरीत नोंद असलेल्या गोष्टी वाचून डॅनियल तसेच इंग्रज न्यायाधीश थक्क झाले. वास्तविक कारण इंग्रज फक्त लुटारू मानत होते, तो माणूस इंग्रजांना भारतातून हाकलून देण्याच्या भव्य योजना आखत होता.

पुढे त्यांच्यावर मग देशद्रोहाचा खटला चालवला गेला आणि त्यानंतर त्यांना काळयापाण्यांची शिक्षा सुनावली ही शिक्षा भोगण्यासाठी त्यांना अंदमानला पाठवण्यात आले. 17 फेब्रुवारी 1883 रोजी काळयापाणीच्या शिक्षेदरम्यान देशाच्या या शूर सुपुत्राला वीरगती मिळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()