Ved, Sanskrit in Madarsha: मदरशांमध्ये वेद अन् संस्कृत शिकवणार! उत्तराखंडच्या मदरशा बोर्डाचा ऐतिहासिक निर्णय

मदरशे म्हणजे मुस्लिमांना धार्मिक शिक्षण देणारी संस्था असंच आजवरच चित्र होतं.
Madarsha
MadarshaTeam eSakal
Updated on

डेहराडून : मदरशे म्हणजे मुस्लिमांना धार्मिक शिक्षण देणारी संस्था असंच आजवरच चित्र होतं. पण आता याच मदरशांमध्ये हिंदू संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या वेद आणि संस्कृत भाषाही शिकवण्यात येणार आहे, उत्तराखंडच्या मदरसा बोर्डानं हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

हा निर्णय ऐतिहासिक याचसाठी आहे की आजवर अशी गोष्ट मदशांबाबत कधीही झाली नव्हती. पण आता या घोषणेवरुन वाद निर्माण झाला आहे. जमीयत उलेमा हिंद या मुस्लिम संघटनेनं या निर्णयाला विरोध केला आहे. (Ved Sanskrit will be taught in Madarsha Historic decision of Madrasa Board of Uttarakhand)

Madarsha
Gujrat Family Suicide: धक्कादायक! सूरतमध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांची आत्महत्या; 3 मुलांचाही समावेश

सर्वधर्मियांचं आस्थेचं प्रतिक

उत्तराखंड मदरशा बोर्डाचे अध्यक्ष मुफ्ती शमून कासमी यांनी मदरशांमध्ये वेद आणि संस्कृत शिकवलं जाणार असल्याची घोषणा केली. इथल्या साबिर दर्ग्याला त्यांनी भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, "साबिर पाक यांचा दर्गा हा केवळ मुस्लिम समुदयांसाठीच नाही तर प्रत्येक धर्माला मानणाऱ्या लोकांसाठी आस्थेचं प्रतिक आहे"

Madarsha
Diamond Hub: देशातील सर्वात मोठे डायमंड हब मुंबईतच होणार; विरोधकांच्या टिकेवर उद्योगमंत्र्यांचे स्पष्टीकरण

महापुरुषांचं आत्मचरित्र शिकवणार

ते पुढे म्हणाले, "उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अल्पसंख्यांकं वर्गासाठी विविध योजना तयार करुन त्यांना विकासाच्या मार्गावर नेत आहेत. तसेच उत्तराखंडमध्ये गाय, गंगा आणि हिमालयाच्या संरक्षणासाठी मुस्लिम समाज अभियान चालवेल तसेच मदरशांमध्ये धार्मिक शिक्षणासह योग, वेद आणि भारतीय महापुरुषांचं आत्मचरित्र देखील शिकवलं जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Madarsha
Nashik News: आमदार सरोज अहिरे विरोधात मोर्चेबांधणी; डॉ. अहिरराव यांच्या राजीनाम्यानंतर चौरंगी लढतीचे संकेत

जमीयत उलेमा हिंदचा विरोध

जमीयत उलेमा हिंद या संघटनेचे अध्यक्ष मौलाना मोहम्मद आरिफ कासमी म्हणाले, "उत्तराखंड मदरशा बोर्डाच्या अध्यक्षांनी लंढौरा इथं जे विधान केलं. त्यानुसार, वेद आणि संस्कृत मदरशांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलं जाईल, याचा कडाडून विरोध करायला हवा.

जमीयत कोणत्याही भाषा किंवा धर्माविरोधात नाही. पण अरबी मदरशांमध्ये संस्कृत आणि वेदांचं शिक्षण कुठल्याही परिस्थितीत सहन केलं जाणार नाही"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()