Tomato Price Hike : देशातील अनेक भागात टोमॅटोचे भाव १०० रुपये किलोच्या पुढे गेले आहेत. घाऊक मंडईतही त्याचे भाव ६० ते ८० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. महाराष्ट्र, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश आदी राज्यांमध्ये प्रचंड वाढले आहेत. दरम्यान काल मध्य प्रदेशात टोमॅटो महाग झाल्यानंतर शहरातील मोबाईल शोरूम ऑपरेटरने ग्राहकांसाठी एक अनोखी ऑफर दिली होती.मोबाईल फोनच्या खरेदीवर २ किलो टोमॅटो फ्री देण्यात आले होते. या ऑफरची चर्चा सर्वत्र रंगली आहे. तर आता यासोबतच वाराणसीमधील एका व्हिडीओ जोरदार चर्चा रंगली आहे. हा व्हिडीओ समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी देखील शेअर केला आहे.(Latest Marathi News)
वाराणसीमध्ये एका भाजी विक्रेत्याने टोमॅटोच्या साठ्याच्या पहाऱ्यासाठी चक्क दोन बाऊन्सर तैनात केलेत. वाराणसीमधील लंका भागातील हा व्हिडीओ सोशल मिडीयावर न्हायरल झाला आहे. येथील एका भाजी विक्रेत्याने टोमॅटोचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी दोन बाऊन्सर तैनात केले आहेत.(Latest Marathi News)
अजय फौजी असे या विक्रेत्याचे नाव आहे. अजय फौजी हा समाजवादी पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्याने टोमॅटोंना सुरक्षित ठेवण्यासाठी दोन बाऊन्सर तैनात केल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.
तर यावर बोलताना अजय फौजी म्हणाले की, "बाऊन्सर तैनात करण्याचे कारण म्हणजे टोमॅटोची दरवाढ. टोमॅटोसाठी मारामारी आणि लूटमार होत आहे. अशा घटना अनेक ठिकाणी घडत आहेत. टोमॅटोसाठी इथं मारामारी होऊ नये म्हणून आम्ही बाऊन्सर तैनात केलेत."(Latest Marathi News)
तर ते पुढे बोलताना म्हणाले की, "टोमॅटोच्या वाढलेल्या किमतीमुळे टोमॅटो खरेदी करताना लोकांमध्ये जोरदार भांडण होत असल्याच्या चर्चा माझ्या कानावर आल्या. आमच्या दुकानात आलेल्या लोकांनीही तसाच प्रयत्न केला. त्यामुळे मी असा निर्णय घेतला, त्यानंतर मी माझ्या दुकानात बाऊन्सर तैनात केले."(Latest Marathi News)
अजय फौजी सध्या 140 ते 160 रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री करत आहेत. ते म्हणाले की, दुकानात तैनात असलेले दोन्ही बाऊन्सर सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ड्युटीवर असतात. तर जोपर्यंत माझ्याकडे टोमॅटोचा साठा आहे तोपर्यंत मी माझ्या दुकानात बाऊन्सर तैनात ठेवेन, असंही त्यांनी सांगितलं आहे.(Latest Marathi News)
अखिलेश यादव यांनी व्हिडिओ शेअर करत भाजपला लगावला टोला
टोमॅटोच्या दरावरुन समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव भाजपला खोचक टोला लगावला आहे. अखिलेख यादव यांनी अजय फौजी यांचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत "भाजपने टोमॅटोला 'Z+' सुरक्षा द्यावी", असं म्हंटलं आहे. तर अखिलेख यादव यांच्या वाढदिवसानिमीत्त अजय फौजी यांनी टोमॅटोचे भाव वाढलेले असतानाही लोकांना टोमॅटो वाटले होते.(Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.