वाहनांच्या फिटनेस टेस्टची चिंता सोडा; सरकार बदलणार नियम

 vehicles fitness testing rules changed ministry of road transport and highways issue notification
vehicles fitness testing rules changed ministry of road transport and highways issue notification Sakal
Updated on

वाहनांची फिटनेस चाचणी (Vehicles fitness testing rules) साठी त्रासदायक ठरणाऱ्या नियमांमध्ये सरकार आता बदल करण्याच्या तयारीत आहे. सरकार ने वाहनांची फिटनेस टेस्ट सोपी करण्यासाठी ऑटोमॅटिक चाचणी करता यावी यासाठी ऑटोमॅटेड टेस्टिंग स्टेशन्स तयार करण्यासंबंधीत नियम आणि अटींमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

आता नवीन नियमांनुसार वाहनधारक आपल्या गाड्यांच्या कोणत्याही राज्यामध्ये रजिस्ट्रेशन करु शकतात, कोणत्याही राज्यात नोंदणी झाली असेल तरु काही फरक पडणार नाही. सरकारने वाहनाची एक्सपायरी डेट संपली असेल किंवा वाहन रस्त्यावर चालवण्यास आयोग्य घोषित करण्याच्या नियमांमध्ये देखील बदल केले आहेत.

रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालया (MoRTH) ने एका निवेदनात याबाबत माहिती दिली आहे. मंत्रालयाने सांगितले की त्यांनी 25 मार्च 2022 रोजी एक सॉफ्ट नोटिफिकेशन जारी केले आहे.

 vehicles fitness testing rules changed ministry of road transport and highways issue notification
भाजपकडून राष्ट्रपतीपदाची ऑफर? मायावती यांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाल्या..

ज्यानुसार अनेक बदल केले आहेत. स्वतः ऑटोमेटेड चेकिंग स्टेशन्सची मान्यता, लाइसेंसिंग आणि नियंत्रण यासंबंधी नियम बदलले आहेत. त्याच्या अंतर्गत फिटनेस टेस्टिंग स्टेशन्सची स्थापना नियमांना सहज बनवले आहे. फिटनेस चाचणीचे रिझल्ट्स देखील ऑटोमॅटिक केले गेले आहेत ज्यामुळे यामध्ये कोणतीही त्रुटी राहाणार नाही. फिटनेस टेस्टमध्ये थेट वाहनांची तपासणी मशीनद्वारे केली जाईल आणि माहिती सर्व्हरपर्यंत पाठवली जाईल.

जर एका राज्यात वाहनाचे रजिस्ट्रेशन झाले असेल त्या वाहनाचे फिटनेस टेस्टिंग करणे अनिवार्य असणार नाही. वाहनांचे अनफिट जाहीर करण्याचे नियमही बदलले आहेत. एटीएस सध्या ऑटोमॅटिक पद्धतीने कोणत्याही वाहनाची फिटनेस तपासणीसाठी अनेक मशीन वापर केला जातो. इलेक्ट्रिक वाहनांच्या तपासणीसाठी अनेक नवीन उपकरणे समाविष्ट केली गेली आहेत. चाचणी रिजल्ट चा नवीन फार्मेटदेखील जारी केला आहे, ज्यामुळे वाहनमालकांना कोणतीही अडचण येणार नाहीये.

 vehicles fitness testing rules changed ministry of road transport and highways issue notification
पुण्यात Ola S1 pro इलेक्ट्रिक स्कूटरला आग; कंपनी म्हणते की..

दरम्यान वायु प्रदुषणामुळे मुंबई, दिल्ली अशा महानगरांमध्ये वाहनांच्या वापराबाबात नियमांमध्ये बदल केला गेला आहे. दहा वर्ष जुने डिझेल वाहन आणि पंधरा वर्ष जुने पेट्रोल वाहनांना पुन्हा रजिस्ट्रेशन न करण्याचा देखील विचार केला गेला. तसेच वाहनांच्या फिटनेसबद्दल देखील नियम कडक केले होते.

 vehicles fitness testing rules changed ministry of road transport and highways issue notification
"महाग पडेल म्हणजे? Ed पकडून आणखी एक खोटे कांड करणार… बरोबर?"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.