Shraddha Murder Case : श्रद्धाचे 35 तुकडे केले, आता आफताबचे 500 तुकडे करा; साध्वी प्राची संतापल्या

'हिंदू मुलींनी मुस्लिम मुलांशी मैत्री करू नये आणि प्रेमही करू नये.'
Shraddha Murder Case
Shraddha Murder Caseesakal
Updated on
Summary

'हिंदू मुलींनी मुस्लिम मुलांशी मैत्री करू नये आणि प्रेमही करू नये.'

विश्व हिंदू परिषदेच्या (Vishwa Hindu Parishad) नेत्या साध्वी प्राची (Sadhvi Prachi) यांनी उत्तर प्रदेशातील बरेली इथं श्रद्धा हत्याकांडाबाबत (Shraddha Murder Case) मोठं वक्तव्य केलंय. पत्रकारांशी संवाद साधताना साध्वी प्राची म्हणाल्या, 'हिंदूनो.. आता एकजूट व्हा आणि कान उघडं ठेवून ऐका.. त्यांना आता त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची वेळ आलीय.'

आफताबनं (Aftab Poonawalla) श्रद्धाचे 35 तुकडे केले, आता त्याचे 500 तुकडे करा, असं खुलं आवाहन साध्वींनी केलंय. साध्वी प्राची म्हणाल्या, 'भारतात अत्यंत सुनियोजित षडयंत्र रचलं जात आहे. इथं हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं जात आहे. त्यांच्यासोबत लव्ह जिहादचा प्रयत्न होत आहे. अशा घटना फक्त हिंदू मुलींसोबतच का होतात? हिंदू मुलंही मुस्लिम मुलींशी लग्न करतात. मात्र, आजपर्यंत भारतात त्यांच्यासोबत अशी एकही घटना समोर आलेली नाही.'

Shraddha Murder Case
Narendra Modi : सोशल मीडियावर PM मोदींचीच हवा; South Indian लूक होतोय ट्रेंड

साध्वी प्राची पुढं म्हणाल्या, आमच्या मुलींचं रक्षण करण्यासाठी प्रसंगी आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. प्रत्येक पालकांनही आपल्या मुलींवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण, त्यांच्या आजूबाजूला कुठेतरी जिहादी आपल्या मुलीला त्याच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करेल. हिंदू मुलींनी मुस्लिम मुलांशी मैत्री करू नये आणि प्रेमही करू नये. जर तुम्हाला प्रेमचं करायचं असेल तर ते आपल्या पालकांवर करा, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()