Vice President Oath:जगदीप धनखड बनले देशाचे १४ वे उपराष्ट्रपती, राष्ट्रपतींनी दिली शपथ

विरोधी पक्षाच्या मार्गारेट अल्वा यांचा पराभव करून धनखड विजयी ठरले
Vice President Oath
Vice President Oathesakal
Updated on

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) उमेदवार जगदीप धनखड यांनी आज भारताचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना राष्ट्रपती भवनात शपथ दिली. धनखड यांची ६ ऑगस्ट रोजी उपाध्यक्षपदी निवड झाली होती. विरोधी पक्षाच्या मार्गारेट अल्वा यांचा पराभव करून धनखड विजयी ठरले.

धनखड यांनी जनता दलातून राजकारणाला सुरुवात केली. धनखड 1989 मध्ये झुंझुनूमधून खासदार झाले. पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्यावरच त्यांना मोठा पुरस्कार मिळाला. 1989 ते 1991 या काळात व्हीपी सिंह आणि चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये त्यांना केंद्रीय मंत्रीही करण्यात आले होते.मात्र, 1991 च्या लोकसभा निवडणुकीत जनता दलाने जगदीप धनखड यांचे तिकीट कापले तेव्हा त्यांनी पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 1993 मध्ये अजमेरमधील किशनगडमधून काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि आमदार झाले. 2003 मध्ये त्यांचा काँग्रेसशी भ्रमनिरास झाला आणि त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. 2019 मध्ये जगदीप धनखड यांना पश्चिम बंगालचे राज्यपाल बनवण्यात आले.

Vice President Oath
Bihar Politics: उपराष्ट्रपतीपदाच्या दाव्यावर नितीश कुमार म्हणतात, "सुशील मोदी विसरले.."

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जगदीप धनखड यांना ५२८ मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांना १८२ मते मिळाली. धनखड यांनी एकूण वैध मतांपैकी ७२ टक्क्यांहून अधिक मतांसह उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.