..तर भाजप-टीएमसी खासदारांना मी फोन करु शकणार नाही; असं का म्हणाल्या मार्गारेट अल्वा?

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत प्रचंड संभ्रम निर्माण झालाय.
Vice Presidential 2022 Candidate Margaret Alva
Vice Presidential 2022 Candidate Margaret Alvaesakal
Updated on
Summary

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत प्रचंड संभ्रम निर्माण झालाय.

Vice President Election 2022 : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत प्रचंड संभ्रम निर्माण झालाय. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि विरोधकांमध्ये थेट लढत आहे. एनडीएचे उमेदवार जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) आणि विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा (Margaret Alva) हे दोघंही जोरदार प्रयत्न करत आहेत. 6 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी दोन्ही उमेदवारांनी प्रचारात पूर्ण ताकद लावलीय.

अशा परिस्थितीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असताना विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांनी आपल्या फोनवरील इनकमिंग आणि आउटगोइंग कॉल्सबाबत आरोप केलाय. मार्गारेट अल्वा यांनी आपल्या ट्विटमध्ये राज्य टेलिकॉम कंपनी बीएसएनएल (BSNL) आणि एमटीएनएललाही (MTNL) टॅग केलंय.

Vice Presidential 2022 Candidate Margaret Alva
ED Inquiry : सोनिया गांधींची 'ईडी'कडून आज पुन्हा चौकशी; राजघाटवर कलम 144 लागू

मार्गारेट अल्वा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, भाजपच्या (BJP) काही मित्रांशी झालेल्या संभाषणानंतर माझ्या मोबाईल फोनवरील सर्व कॉल डायव्हर्ट करण्यात आले आहेत आणि मी एकही कॉल करू शकत नाही किंवा घेऊ शकत नाही. अल्वा यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढं म्हटलंय की, 'जर तुम्ही माझा फोन रिस्टोअर केला नाही, तर आज रात्रीपासून भाजप, टीएमसी किंवा बीजेडीच्या कोणत्याही खासदाराला मी फोन करणार नाही.'

Vice Presidential 2022 Candidate Margaret Alva
छत्रपतींच्या बाबतीतही विश्वासघातकाचं राजकारण, पाठीत खंजिर खुपसणाऱ्यांना जनता माफ करणार नाही : राऊत

उपराष्ट्रपती पदाच्या विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांनी आपल्या ट्विटमध्ये विचारलंय की, आता तुम्हाला माझ्या केवायसीची गरज आहे का? एमटीएनएलनं त्यांचं केवायसी निलंबित केलं असून 24 तासांच्या आत सिम कार्ड बंद केलं जाईल, असा दावाही त्यांच्या वतीनं करण्यात आलाय. विशेष म्हणजे, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांनी मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी दिलीय. तर, पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांना एनडीएचे उमेदवार म्हणून नामांकन दिल्यानंतर विरोधकांनी मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटकातील मार्गारेट अल्वा यांना उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाची उमेदवारी दिली जाईल, अशी घोषणा केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.