चित्रपटांत हिंसाचार, अश्लीलता नको; उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू

उपराष्ट्रपती नायडू यांचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात निर्मात्यांना आवाहन
venkaiah  naidu
venkaiah naidusakal media
Updated on

नवी दिल्ली : आपली संस्कृती आणि परंपरा यांना धक्का लागेल, अशी कोणतीही गोष्ट सिनेमा क्षेत्राने करू नये. तसेच चित्रपटांमधून हिंसाचार, अश्लीलता आणि असभ्यतेला थारा देऊ नये, असे आवाहन उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी चित्रपट निर्मात्यांना केले.चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांना प्रदान करण्यात आला. तसेच ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण नायडू यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, राज्यमंत्री एस. मुरुगन, माहिती आणि केंद्रीय सचिव अपूर्व चंद्रा, परीक्षक मंडळाचे अध्यक्ष एन. चंद्रा, कथाबाह्य चित्रपट ज्युरी अध्यक्ष अरुण चढ्ढा आदी यावेळी उपस्थित होते. सर्वोच्च चित्रपट स्नेही राज्याचा पुरस्कार सिक्कीम या राज्याने पटकावला.

चित्रपट म्हणजे उच्च उद्देश, सामाजिक आणि नैतिक संदेश देण्यासाठीचे साधन असावे. चित्रपटातून हिंसाचाराचे ठळक दर्शन न घडवता सामाजिक अनिष्ट बाबीं विरोधात समाजाच्या नापसंतीचा आवाज उठवला पाहिजे. जगातला सर्वात मोठा चित्रपट निर्माता ही भारताची सॉफ्ट पॉवर असल्याचा उल्लेख करत आपले चित्रपट जपान, इजिप्त, चीन, अमेरिका, रशिया, मध्य पूर्व आणि ऑस्ट्रेलियासह संपूर्ण जगभरात पाहिले आणि नावाजले जातात. चित्रपटांना भौगोलिक आणि धार्मिक सीमा नसून चित्रपट सार्वत्रिक भाषा व्यक्त करतात. राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे भारतीय चित्रपट उद्योगातल्या प्रतिभेचे, समृद्धतेचे आणि वैविध्याचेही दर्शन घडवतात, असे ते म्हणाले.

राष्ट्रीय पुरस्कारांत महाराष्ट्र

दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेता रजनीकांत यांना प्रदान. आनंदी गोपाळसाठी समीर विद्वांस यांना रजत कमळ, ताज महाल या मराठी चित्रपटालाही रजत कमळ प्रदान करण्यात आले. सर्वोत्कृष्ट मुलांचा चित्रपट म्हणून कस्तुरी या हिंदी चित्रपटाला सुवर्ण कमळ प्रदान करण्यात आले.

या चित्रपटाचे दिग्दर्शक विनोद कांबळे आणि निर्माती पायल डोके यांचा गौरव करण्यात आला. उत्कृष्ट अभिनयासाठी मनोज वाजपेयी (भोसले), कंगणा राणावत (मनिकर्णिका) यांना गौरविण्यात आले.

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट बार्डोचा गौरव करणात आला. निर्माता- ऋतुजा गायकवाड दिग्दर्शक भीमराव मोरे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट शोध चित्रपटाचा पुरस्कार जक्कल या चित्रपटाला प्रदान करण्यात आला. त्यासाठी प्रतिक सुरेश जोशी, विवेक वाघ यांना सन्मानित करण्यात आले. पिकासो या चित्रपटासाठी अभिषेक मोहन वारंग विशेष प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

लता भगवान करे : एक संघर्ष गाथा या चित्रपटासाठी लता करे यांना, ‘खिसा’ या कलात्मक चित्रपटासाठी दिग्दर्शक राज प्रीतम मोरे, संतोष मिठाणी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.लेखक अशोक राणे यांना ‘चित्रपट पाहिलेला माणूस’ या पुस्तकासाठी विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()