लंडनमध्ये बंगाली भाषेतील साईनबोर्ड्स पाहून भारावल्या ममता बॅनर्जी

लंडनमध्ये बंगाली भाषेतील साईनबोर्ड्स पाहून भारावल्या ममता बॅनर्जी
Updated on

कोलकाता: बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज सोमवारी ट्विट करत बंगाली संस्कृतीबाबत आपला आनंद व्यक्त केला आहे. 'हा आमच्या संस्कृती आणि वारशाचा विजय' असल्याचं म्हणत त्यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. लंडनमधील ट्यूब रेल्वे व्हाईटचॅपेल स्टेशनवर साईनबोर्डसाठी बंगाली भाषा देखील वापरली गेली आहे. त्याबाबत त्यांनी हा आनंद व्यक्त केला आहे. व्हाईटचॅपल स्टेशन हे लंडनमधील व्हाईटचॅपल स्ट्रीट मार्केटच्या मागे आणि रॉयल लंडन हॉस्पिटलच्या समोर आहे. (Mamata Banerjee)

लंडनमध्ये बंगाली भाषेतील साईनबोर्ड्स पाहून भारावल्या ममता बॅनर्जी
HSC Board Paper Leak : रसायनशास्त्रानंतर १२वीचा गणिताचा पेपरही फुटला!
लंडनमध्ये बंगाली भाषेतील साईनबोर्ड्स पाहून भारावल्या ममता बॅनर्जी
हे मोदी, गडकरी आणि फडणवीसांना मान्य आहे का? : संजय राऊत

ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवर म्हटलंय की, “लंडन ट्यूब रेलने व्हाईटचॅपेल स्टेशनवर बंगाली ही संकेतांसाठीची भाषा म्हणून स्वीकारण्यात आली आहे. हे 1000 वर्षे जुन्या बंगाली भाषेचे जागतिक महत्त्व आणि सामर्थ्य दर्शवत आहे. हे पाहून अभिमान वाटतो आहे. त्या पुढे म्हणाल्या की, बंगाली संस्कृतीतील लोकांनी समान सांस्कृतिक दिशांमध्ये एकत्र येऊन काम केलं पाहिजे. (Whitechapel Station)

बांगलादेशचे राज्यमंत्री जुनैद अहमद यांनी सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे. यामध्ये लंडनमधील व्हाईटचॅपेल रोड आणि डर्वर्ड स्ट्रीटवर असलेल्या लंडन अंडरग्राउंड आणि लंडन ओव्हरग्राउंड स्टेशनचे नाव आता इंग्रजीव्यतिरिक्त बांगला भाषेत देखील लिहलेलं आहे.

महापौर जॉन बिग्स यांनी ट्विट केलंय की, स्टेशनच्या बाहेर आणि संपूर्ण स्टेशनवर इंग्लिश आणि बंगाली भाषेतील फलकांना लंडन बरो ऑफ टॉवर हॅमलेट्स कौन्सिलने निधी दिला आहे. “व्हाईटचॅपल स्टेशनवर ही दोन्ही भाषेतील साईनबोर्ड्स बसवलेले पाहून आनंद झाला असल्याचं त्यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.