30 वर्षानंतर दोन मृतकांचा थाटामाटात पार पडला विवाह सोहळा, पहा Video

30 वर्षापूर्वीचं निधन झालेल्या एका जोडप्याचा विवाह सोहळा धुमधडाक्यात पार पडला आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
viral video
viral videosakal
Updated on

भारतात वेगवेगळ्या प्रातांत वेगवेगळ्या तऱ्हेने विवाह सोहळे पार पडतात आणि प्रत्येक विवाह सोहळा विशिष्ट प्रथेला धरुन पार पाडला जातो. पण कधी तुम्ही ३० वर्षापूर्वीचं निधन झालेल्या वधूवराच्या सोहळ्याला गेले आहे का? तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे. मृत्यू पावलेल्या वधू वराचा विवाहा कोण जाणार? मृत्यू झालेले वधू वर तरी राहणार का? हो पण हे खरंय.

30 वर्षापूर्वीचं निधन झालेल्या एका जोडप्याचा विवाह सोहळा धुमधडाक्यात पार पडला आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (video viral of marriage ceremony was conducted 30 years after groom bride death.)

viral video
Video Viral: 'भावा माफ कर!' विल स्मिथनं ख्रिसची मागितली माफी..

ही घटना आहे कर्नाटकातील. तुम्हाला आश्चर्य वाटेल हे कसं शक्य आहे. पण हे खरंय आणि हि एक कर्नाटकातील प्रथा आहे. दक्षिणा कन्नडा या प्रथेनुसार ज्या नवजात बालकांचा जन्मादरम्यान मृत्यू होतो त्या बालकाचं दुसऱ्या नवजात मृत बालकाशी लग्न लावल्या जातं. मृत नवजाताच्या मृत्यूच्या 25 ते 30 वर्षानंतर म्हणजे ते तरुण्यवस्थेत आल्यानंतर त्यांचा विवाह सोहळा पार पाडण्यत येतो.

viral video
Viral video: नदीच्या काठी प्रियकर शोधतोय प्रेयसीच्या डोक्यातील उवा..

विशेष म्हणजे या सोहळ्यास वधु वर उपस्थित नसले तरी त्यांच्या कडील लोक उपस्थित असतात आणि अगदी वधू वर हयात असल्यासारखे विवाह सोहळा पार पडतो. यात एक विशेष अट आहे ती म्हणजे या या विवाह सोहळ्यात लहान मुलांना प्रवेश नसतो.

viral video
Video : Ajit Pawar यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर काय म्हंटलं ?

भारत हा जुन्या रुढी परंपरेने भरलेला देश आहे. तरी २१ व्या शतकात 2 मृतकांचे लग्न ही बाब जरा धक्कादायक आणि चिंताजनक वाटत असली तरी हा परंपरेचा एक भाग आहे. त्यामुळे आजही ही प्रथा जपली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.