चंदीगड- सहजपणे मिळणाऱ्या ड्रग्जवरुन एका विद्यार्थ्याने थेट पोलिसांना जाब विचारल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, हरियाणाच्या सोनिपत येथे व्यसनमुक्ती प्रबोधनासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी एका मुलाने प्रश्न विचारून थेट पोलिसांना निरुत्तर केलं आहे. (Video of a college student questioning the police about the easy availability of drugs has gone viral on social media)
शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांना अगदी सहजपणे ड्रग्ज मिळते. ड्रग्ज कोण, कुठे विकते याची त्यांना माहिती सहज मिळते. मग पोलिसांना ड्रग्ज विक्रेते का सापडत नाही. अशा प्रकरणामध्ये पोलीस काय कारवाई करतात असा थेट प्रश्न विद्यार्थ्याने विचारला आहे.
सर, आपण इतकी मोठी व्यसनमुक्ती मोहीम राबवली आहे. पण, विद्यापीठ हे ड्रग्ज व्यसनाचे केंद्र बनलं आहे. आज अनेक विद्यार्थी येथे जमले आहेत. मला सांगायचंय की, चॉकलेट जितक्या सहजपणे मिळतात तितत्याच सहजपणे गांजा किंवा असेच वाईट पदार्थ मिळतात. पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्याला ड्रग्ज विक्रेता सहज मिळतो. मग पोलिसांना का मिळत नाही? पोलीस कुठे कमी पडत आहेत का? असा थेट सवाल विद्यार्थ्याने केला.
विद्यार्थी पुढे म्हणतो की, मी एक विद्यार्थी आहे. मला माहिती आहे की, जिथे पोलीस स्टेशन आहे, त्याच्या समोरच एका ठिकाणी गांजा विकला जातो. त्यामुळे हे पोलीस प्रशासनाचे अपयश आहे असं तुम्हाला वाटत नाही का? असा प्रश्न विद्यार्थी करतो.
या प्रश्नावर पोलीस अधिकारी काय उत्तर देतात हे कळत नाही. कारण, विद्यार्थी बोलल्यानंतर व्हिडिओ संपतो. काहीजणांना हा व्हिडिओ पोस्ट केला असून तो सोनिपतमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील असल्याचा दावा केला आहे.
व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर अनेकजण मुलाचे कौतुक करत आहेत. सहसा अनेकजण पोलिसांना प्रश्न विचारण्यास घाबरतात. पण, मुलाने हिम्मत दाखवून प्रश्न विचारल्याने त्याचे कौतुक होतंय. आणखी काही भारतीयांनी असं धाडस दाखवलं तर खऱ्या अर्थाने आपण विश्वगुरु होऊ असं एका युझरने म्हटलं. दरम्यान, गांजा किंवा तत्सम अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा, 1985 अंतर्गत बेकायदा आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.