Video: पंतप्रधान मोदींनी रॅलीदरम्यान महिलेचे केले चरण स्पर्श; कोण आहेत 80 वर्षीय पूर्णमासी जानी?

Padma Shri awardee Purnamasi Jani: मोदींनी त्यांचा सन्मान केला अन् चरण स्पर्श करुन आशीर्वाद घेतले. पूर्णमासी या कोण आहेत हे जाणून घेऊया.
Purnamasi Jani
Purnamasi Jani
Updated on

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभर दौरा करत आहेत. आज त्यांनी ओडिशाच्या कंधमाल येथे सभा घेतली. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पद्मश्री पुरस्कार प्राप्त आदिवासी कवयित्री पूर्णमासी जानी (Purnamasi Jani ) यांची भेट घेतली. या वेळी मोदींनी त्यांचा सन्मान केला अन् चरण स्पर्श करुन आशीर्वाद घेतले. पूर्णमासी या कोण आहेत हे जाणून घेऊया.

पूर्णमासी जानी यांचा जन्म १९४४ साली झाला आहे. त्या ८० वर्षांच्या आहेत. पूर्णमासी या तडीसरु बाई नावाने देखील ओळखल्या जातात. त्या कवयित्री आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. ओडिया, कुई आणि संस्कृत भाषेमध्ये त्यांनी ५० हजारांहून अधिक भक्तिगीते लिहिली आहेत. २०२१ मध्ये त्यांच पद्मश्री देऊन सन्मान करण्यात आला होता. पद्मश्री हा देशातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक आहे.

Purnamasi Jani
Beed Lok Sabha Election: बीड लोकसभा निवडणुकीत मतांचे ध्रुवीकरण निर्णायक; कोण जाणार दिल्लीत?

पंतप्रधान मोदी यांनी ओडिसा येथे गेल्यानंतर कवयित्रीचे चरण स्पर्श केले. यासंदर्भातील व्हिडिओ पीटीआयने शेअर केला आहे. देशात १९५४ पासून पद्म पुरस्कार दिले जातात. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची घोषणा केली जाते. सरकारकडून विविध क्षेत्रामध्ये असामान्य काम करणाऱ्या लोकांची नावे मागवली जातात. त्यानंतर काहींची पद्म पुरस्कारासाठी निवड केली जाते.

पंतप्रधान मोदींची नवीन पटनायक यांच्यावर टीका

पंतप्रधान मोदी यांनी कंधमाल येथील सभेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांची नावे सांगावेत असं आव्हान पंतप्रधान मोदी यांनी केलं. मोदी म्हणाले की, 'निवडणुकीमध्ये भाजप विक्रम करणार आणि ४०० चा आकडा पार करणार.'

Purnamasi Jani
महाराष्ट्र, यूपी, हरियाणा आणि बिहार.. नंदुरबारच्या सभेची तुफान गर्दी पाहून राहुल गांधींनी केली भविष्यवाणी

राहुल गांधी यांच्यावर टीका करताना मोदी म्हणाले की, 'राहुल गांधी २०२४ च्या निवडणुकीत तेच भाषण देत आहेत जे त्यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये दिलं होतं. काँग्रेसला लोकसभा निवडणुकीमध्ये १० टक्के जागा देखील मिळणार नाहीत. ५० जागा देखील काँग्रेस जिंकू शकणार नाही. त्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षाचा दर्जा देखील मिळणार नाही.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.