रायपूर
Sachin Tendulkar's Prank Video : छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे झालेल्या कोविड चाचणीदरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं एक गंमत केली. त्यामुळे चाचणीवेळी निर्माण झालेलं तणावाचं वातावरण क्षणभरासाठी हास्यात परावर्तीत झालं. या गंमतीचा व्हिडिओ सचिनने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ १४ लाखांहून अधिक युजर्सने पाहिला असून अनेकांनी त्यावर कमेंट्सही केल्या आहेत.
सचिननं केली गंमत...अन् निघाले हास्याचे फवारे
रोड सेफ्टी वर्ल्डने आयोजित केलेल्या क्रिकेट मालिकेत सचिन इंडिया लिजेंड्स संघाकडून खेळतो आहे. दरम्यान, रायपूर येथे होणाऱ्या या मालिकेतील सामन्यापूर्वी संघातील प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी एक नर्स सर्वांचे स्वॅब घेत होती, स्वॅबसाठी सचिननचा नंबर आल्यानंतर तो समोर ठेवलेल्या खुर्चीत जाऊन बसला. यावेळी नर्स सचिनच्या नाकातून स्वॅब घेत असताना सचिन अचानक दुखल्याचं नाटक करत ओरडला. त्यामुळे नर्स क्षणभर गोंधळली आणि ती मागे सरकली. यावेळी सचिन हसायला लागला आणि त्याने नर्सला विचारलं "टेन्शन तुम्हाला आलंय की मला?" यावर तिथे उपस्थितांकडून मिश्किल हास्याचे फवारे उडाले.
२०० टेस्ट मॅच आणि २७७ कोरोना टेस्ट
हा Prank Video सचिनने मंगळवारी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केला आणि पोस्ट करताना लिहिलं, "मी २०० टेस्ट मॅचेस खेळलोय आणि २७७ कोविडच्या टेस्ट केल्यात!... मूड हलका करण्यासाठी केलेली ही छोटीशी गंमत... आमच्या मदतीसाठी आमच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे कौतुक...."
क्रीडा विद्यापीठ याच वर्षी सुरू होणार; कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू
रोड सेफ्टी सेरीजमध्ये सचिन इंडिया लिजेंड्स या टीमकडून खेळत आहे. मंगळवारी त्यांच्या टीमचा सामना इंग्लंड लिजेंट्ससोबत झाला. गेल्या आठवड्यात सचिनने बांगलादेश लिजेंड्ससोबत झालेल्या सामन्यात २६ चेंडूंमध्ये ३३ धावा केल्या होत्या. या सामन्यात ११० धावांचं टार्गेट इंडिया लिजेंड्सनं अवघ्या १०.१ षटकात पूर्ण करत बांगलादेश लिजेंड्सचा पराभव केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.