Rahul Gandhi Video Viral: 'हाय गर्मी...', राहुल गांधींनी भाषणादरम्यान डोक्यावर ओतली पाण्याची बाटली, पाहा VIDEO

Rahul Gandhi Video Viral: काँग्रेस नेते राहुल गांधी उत्तर प्रदेशातील देवरिया दौऱ्यावर आहेत, त्यावेळी भाषण करत असताना त्यांना गरम होऊ लागल्याने त्यांनी डोक्यावर पाण्याची बाटली ओतली.
Rahul Gandhi Video Viral
Rahul Gandhi Video ViralEsakal
Updated on

कडाक्याच्या उन्हाळ्यात पार पडत असलेल्या लोकसभा निवडणुकीने नेत्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. दरम्यान आता राहिलेल्या शेवटच्या टप्प्याची जोरदार तयारी सुरू आहे. याचवेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या रॅलीत त्यांनी पाण्याने भरलेली बाटली डोक्यावर ओतल्याचे दृश्य दिसलं. ते उत्तर प्रदेशातील देवरिया येथे एका सभेला संबोधित करत होते, भाषण सुरू असताना त्यांनी पाणी प्यायला सुरुवात केली आणि नंतर म्हणाले, 'खुप गरम आहे.' यानंतर त्यांनी संपूर्ण पाण्याची बाटली डोक्यावर ओतली.

देशातील उत्तर-पश्चिमी राज्यांमध्ये कडक ऊन आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी सर्व पक्षांचे नेते रॅलींमध्ये व्यस्त आहेत. कमाल तापमान सामान्यपेक्षा ८ अंश सेल्सिअस जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींसह अनेक नेते लोकांना उष्णतेपासून दूर राहण्याचा सल्ला देताना दिसत आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही देवरियाच्या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आणि त्यांच्या 'देवाने मला पाठवले' या वक्तव्यावर पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "...बाकी सर्व बायोलॉजिकल आहेत, पण नरेंद्र मोदी जी बायोलॉजिकल नाहीत. त्यांच्या 'देवाने' त्यांना अंबानी आणि अदानींच्या मदतीसाठी पाठवले आहे, पण 'देवाने' त्यांना शेतकरी आणि मजुरांच्या मदतीसाठी पाठवले नाही."

Rahul Gandhi Video Viral
PM Modi: देवानेच मला पाठवलंय, कारण माझ्यातील शक्ती ही दैवी आहे; पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, "देवाने त्यांना असे पाठवले असते तर त्यांनी गरीब आणि शेतकऱ्यांना मदत केली असती. हा नरेंद्र मोदींचा देव आहे." पुढे ते म्हणाले, “काही लोक मोदींना प्रश्न विचारतात. मोदीजी, तुम्ही आंबे कसे खातात? तुम्ही धुतल्यानंतर किंवा सोलल्यानंतर खाता का? यावर मोदीजी म्हणतात की आम्ही काही करत नाही, सर्व काही आपोआप होते.

Rahul Gandhi Video Viral
Panch Agnee Tapasya: तापमान वाढ रोखण्यासाठी केली 'कडक तपश्चर्या'; साधुचा उष्माघातानं मृत्यू!

राहुल गांधी पुढे म्हणाले, "देवाने त्यांना पाठवले असते, तर देवाने तुम्हाला सांगितले असते, भारतातील सर्वात कमकुवत लोकांना मदत करा, शेतकऱ्यांना मदत करा, पण मोदीजींचा देव म्हणाला, अंबानींना मदत करा, अदाणींना मदत करा." अदानींचे 16 लाख कोटी रुपये माफ करा, तो कोणता देव आहे, तो मोदीजींचा देव आहे, असं म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.

Rahul Gandhi Video Viral
Arvind Kejriwal: केजरीवाल अन् दारु घोटाळ्यातील आरोपींमध्ये थेट मेसेजद्वारे संवाद; ईडीचा कोर्टात मोठा दावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.