Video: राजकोटच्या 'गेम झोन'मध्ये भीषण आग कशी लागली? व्हिडिओ आला समोर, 27 जणांचा गेला होता जीव

gaming zone fire CCTV camera footage: आग लागण्यास कशी सुरू झाली याचा प्रसंग सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. पीटीआयने यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे.
gaming zone fire
gaming zone fire
Updated on

गांधीनगर- दोन दिवसांपूर्वी राजकोटच्या टीआरपी गेम झोनमध्ये आग लागून २७ जणांचा मृत्यू झाला होता. यात चार मुलांचा देखील समावेश होता. गेम झोनमध्ये आग कशी लागली याबाबतचा व्हिडिओ समोर आला आहे. आग लागण्यास कशी सुरू झाली याचा प्रसंग सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. पीटीआयने यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका ठिकाणी वेल्डिंग सुरु होती. त्याच ठिकाणाहून आगीला सुरुवात झाली. पीटीआयने ४० सेकंदाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. आगीच्या आजूबाजूला ज्वलनशील वस्तू ठेवलेल्या होत्या. काही कर्मचारी या वस्तू हटवण्याचा प्रयत्न करतात. पण, आग भडकते आणि ती संपूर्ण गेम झोनमध्ये पसरते.

gaming zone fire
Rajkot TRP Game Zone Fire: राजकोट गेमिंग झोन प्रकरणी कारवाईला वेग; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, 2 अटकेत, 4जणांचा शोध

इंधन, टायर, फायरग्लास शेड, थर्माकोल शीट गेमिंग झोनच्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. त्यामुळेच आगीने भीषण स्वरुप धारण केले. पोलिसांच्या माहितीनुसार, गेमिंग झोनने महापालिकेकडून फायर सेफ्टी क्लिअरन्स घेतलेलं नव्हतं. गेमिंग झोनच्या मालकाने काही फायर सेफ्टी उपकरणांचे बिले पोलिसांकडे सादर केली आहेत. त्याने उपकरणे लावण्यास सुरुवात केली होती.

gaming zone fire
Delhi Fire News : विनापरवाना सुरु होतं दिल्लीतलं बेबी केअर हॉस्पिटल; चौकशीत आढळले अनेक गैरप्रकार

राजकोट पोलीस कमीशनर राजू भार्गवा यांनी पत्रकारांना सांगितलं की, गेमिंग झोनला नोव्हेंबर २०२३ मध्ये स्थानिक पोलिसांनी परवानगी दिली होती. याचा १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत नुतनीकरण करण्यात आले होते. गेमिंग झोनला रस्ते आणि इमारत विभागाकडून परवानगी मिळाली होती. फायर सेफ्टी उपकरणे बसवल्याबाबत त्यांनी एनओसी मागितली होती, पण उपकरणं बसवण्याचे काम सुरु होते.

गेमिंग झोनच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, सदर घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.