Vidhan Parishad Election: काँग्रेस अॅक्शन मोडमध्ये! विधानपरिषदेत क्रॉस वोटिंग करणाऱ्या 'या' पाच आमदारांवर कारवाईचे आदेश

Action against MLAs who cross voted in Legislative Council: कोणत्या आमदारांवर कारवाई होणार त्यांची नावंही समोर आली आहेत.
Maharashtra Congress Nana Patole Vidhan Sabha Election 2024
Maharashtra Congress Nana Patole Vidhan Sabha Election 2024 Esakal
Updated on

नवी दिल्ली : विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या पाच आमदारांवर कारवाई करण्याचा निर्देश काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिले आहेत. त्यामुळं आता काँग्रेसनं पक्षाविरोधात काम करणाऱ्या आमदारांना कडक इशारा दिला आहे. कोणत्या आमदारांवर कारवाई होणार त्यांची नावंही समोर आली आहेत.

Maharashtra Congress Nana Patole Vidhan Sabha Election 2024
Infosys Freshers Hiring : इन्फोसिसमध्ये होणार फ्रेशर्स आयटी इंजिनिअर्सची मोठी भरती; जाणून घ्या प्लॅन

काँग्रेसकडून पाच आमदारांवर कारवाई होणार असली तरी इतर दोन आमदारांची पुन्हा चौकशी करण्याचे निर्देशही मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिले आहेत. दरम्यान कारवाई होणाऱ्या आमदारमध्ये झिशान सिद्दीकी, सुलभा खोडके, हिरामण खोसकर, जितेश अंतापूरकर, मोहन हंबिर्डे यांचं नाव असल्याची माहिती मिळते आहे.

Maharashtra Congress Nana Patole Vidhan Sabha Election 2024
Heavy Rain Mumbai : मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात; दादर, भायखळा, मस्जिद बंदर परिसरात जोरदार पाऊस

नुकत्याच पार पडलेल्या १३ जागांसाठीच्या द्विवार्षिक विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला होता. काँग्रेसच्या आमदारांनी त्यांना मतं दिली नसल्यानं त्यांचा पराभव झाल्याचं स्पष्ट झालं आहे. काँग्रेसची ही मतं महायुतीच्या उमेदवारांना गेल्याचा दावा केला जात होता.

Maharashtra Congress Nana Patole Vidhan Sabha Election 2024
USA Presidential Election: अखेर बायडन घेणार माघार! राष्ट्राध्यक्षपदासाठी भारतीय वंशाच्या कमला हॅरिसबाबत केलं मोठ विधान

दरम्यान, या निवडणुकीनंतर लगेचच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संबंधितांवर कारवाईचा इशारा दिला होता. यासाठी त्यांनी दिल्लीला जाऊन पक्षश्रेष्ठींच्या कानावर हा सर्व प्रकार घातला आणि आमदरांवर कडक कारवाईची शिफारस केली होती. कारण यापूर्वी देखील विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यानं काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.