Vienna Terror Attack: ऑस्ट्रियाने दिल्लीतील दूतावास केलं बंद

Austrian Embassy
Austrian Embassy
Updated on

नवी दिल्ली- व्हिएन्नामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ऑस्ट्रियाने नवी दिल्लीतील आपला दूतावास तात्पुरत्या काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. खबरदारी म्हणून 11 नोव्हेंबरपर्यंत हा दुतावास बंद असणार आहे. ऑस्ट्रेयिन दुतावासाने मंगळवारी आपले निवेदन जारी करत, 11 नोव्हेंबरपर्यंत दुतावास बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तसेच नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.  

ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये सोमवारी रात्री बंदूकधाऱ्यांनी दिसेल त्याच्यावर बेछुट गोळीबार केला. लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर गोळीबार करण्यात आला. या दहशतवादी हल्ल्यात एक दहशतवादी मारला गेला आहे. हल्ल्यात 7 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर 15 पेक्षा अधिकजण जखमी झाल्याची माहिती आहे.

US Election: निवडणुकीनंतर हिंसाचाराची भीती; नागरिकांनी दरवाजे, खिडक्या...

ऑस्ट्रियाचे गृहमंत्री कार्ल नेहआमर यांनी सांगितले की, हल्ल्यामध्ये मारला गेलेला दहशतवादी इस्लामिक स्टेटचा समर्थक होता. नागरिकांना घरामध्ये राहण्याचा आणि बाहेन न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासंबंधी अधिकचा तपास सुरु आहे. 

ऑस्ट्रियाचे चान्सलर सेबेस्टियन कुर्ज यांनी हा अत्यंत घृणास्पद हल्ला असल्याचे म्हटले आहे. हल्लेखोरांनी विविध ठिकाणी अंधाधुंद गोळीबार केला. यात अनेकजण जखमी झाले आहेत. यामध्ये एका पोलिसाचाही समावेश आहे. व्हिएन्ना पोलिसांनी एका संशयित हल्लेखोराचा खात्मा केल्याची माहिती आहे. 

ऑस्ट्रियाच्या गृहमंत्र्यांनी हल्लेखोरांविरोधात सुरक्षा दलाचे ऑपरेशन सुरु असल्याचे माध्यमांना सांगितले. व्हिएन्नाचे महापौर मायकल लुडविग यांच्या मते 15 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सात जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, फ्रान्समधील दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाचा युरोपमधील आणखी एका देशात झालेल्या दहशतवादी हल्ल्याने चिंता वाढली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.