Vikram Batra Birth Anniversary : पाकिस्तानचे इरादे उद्ध्वस्त करून विक्रम बत्रा कारगिल युद्धाचे 'शेरशाह' बनले

कारगिलमध्ये अदम्य धैर्य दाखवणारे कॅप्टन विक्रम बत्रा यांचा आज वाढदिवस
Vikram Batra Birth Anniversary
Vikram Batra Birth Anniversaryesakal
Updated on

Vikram Batra Birth Anniversary : कारगिलमध्ये अदम्य धैर्य दाखवणारे कॅप्टन विक्रम बत्रा यांचा आज वाढदिवस आहे. 9 सप्टेंबर 1974 रोजी पालमपूर येथे जन्मलेल्या विक्रम बत्रा यांच्या मनात देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द होती. त्यामुळेच त्यांनी हाँगकाँगच्या कंपनीत निवड झाल्यानंतरही देशसेवा करण्याला प्राधान्य दिलं.

जेव्हा-जेव्हा कारगिलचा उल्लेख होतो तेव्हा लष्कराच्या एका शूर जवानाचा उल्लेख होतो, ज्याने पाकिस्तानचे वाईट इरादे हाणून पाडले होते. त्यांचा डाव फसला आणि भारताच्या विजयाचा इतिहास लिहिला गेला. ते नाव होतं कॅप्टन विक्रम बत्रा. ज्यांना भारत, शेरशाह या नावाने ओळखतो.

Vikram Batra Birth Anniversary
Health: अति फिटनेससुद्धा ठरतोय आरोग्यासाठी घातक?

कारगिलमध्ये अतुलनीय शौर्य दाखवणारे कॅप्टन विक्रम बत्रा यांचा आज वाढदिवस आहे. 9 सप्टेंबर 1974 रोजी पालमपूर येथे जन्मलेल्या विक्रम बत्रा यांच्या मनात देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द होती. त्यांनी हाँगकाँगच्या कंपनीत निवड झाल्यानंतरही देशसेवा करण्याला प्राधान्य दिलं.

Vikram Batra Birth Anniversary
Health: अति फिटनेससुद्धा ठरतोय आरोग्यासाठी घातक?

शेरशाह नाव कसं मिळालं?

शत्रूने उंचीवर आपलं बस्तान बांधलं होतं. भारतीय सैनिक खालच्या भागात होते. शत्रूची ही रणनीती एखाद्या शक्तिशाली शस्त्रापेक्षा कमी नव्हती. अशा परिस्थितीत श्रीनगर-लेह रस्त्याच्या अगदी वर असलेल्या पॉइंट 5140 वर कमांड मिळवण्याची जबाबदारी कॅप्टन विक्रम बत्रा यांच्याकडे सोपवण्यात आली. पण त्यांची रणनीती पाकिस्तानी सैनिकांना समजल्याबरोबर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला.

Vikram Batra Birth Anniversary
Childrens Health Tips : मुलांमध्ये हायपरटेन्शनची समस्या झपाट्याने वाढतेय?;रामदेव बाबांनी पालकांना दिलाय लाखमोलाचा सल्ला

यादरम्यान कॅप्टन विक्रमच्या टीमने शत्रूचे अनेक सैनिक मारले. कॅप्टन आणि त्यांच्या टीमच्या आवेशापुढे शत्रू टिकू शकला नाही. टीमने 20 जून 1999 रोजी पहाटे 3.30 वाजता पॉइंट 5140 शिखर काबीज केले. शिखरावर पोहोचल्यानंतर त्यांनी रेडिओवर संदेश दिला आणि म्हणाले- ये दिल मांगे मोर. या ऑपरेशनचा कोडवर्ड होता शेरशाह.

Vikram Batra Birth Anniversary
Health Care News: मिक्स फ्रूटमध्ये केळी मिक्स करताय? असं केल्याने होईल त्रास, जाणून घ्या तज्ञ काय म्हणतात

...आणि असे शहीद झाले

पॉइंट 5140 शिखर जिंकल्यानंतर त्यांना पॉइंट 4875 शिखर ताब्यात घेण्याची जबाबदारी देण्यात आली. हे शिखर गाठणे सोपे नव्हते. दोन्ही बाजूंनी खडी चढण होती. शत्रूंनी नाकेबंदी करून अडचणी वाढवल्या होत्या. भारतीय टीमने 7 जुलै रोजी मिशनला सुरुवात केली. इकडे अरुंद चढाई आणि समोरच्या ठिकाणी शत्रूची उपस्थिती जिथून थेट हल्ल्याचा धोका अशा कचाट्यात भारतीय सैनिक सापडले होते. कॅप्टन विक्रम बात्रा यांनी पूर्ण उत्साहाने आणि अदम्य धैर्याने शत्रूच्या दिशेने जात पाकिस्तानी लष्कराच्या 5 सैनिकांना ठार केले.

Vikram Batra Birth Anniversary
Health Care News: तुम्हीही रोज शेपवेअर वापरताय? होऊ शकतात हे गंभीर परिणाम, जाणून घ्या

या झटापटीत ते जखमी झाले, पण थांबले नाहीत. जमिनीवर लपून-छपून सरपटत ते शत्रूच्या जवळ आले आणि ग्रेनेड फेकून रस्ता मोकळा केला. कॅप्टन विक्रम टीमचे नेतृत्व करत असूनही त्यांनी सैनिकांमध्ये तोच उत्साह कायम ठेवला. युद्धादरम्यान, त्यांच्या सुभेदाराने जखमी विक्रम बत्रा यांना मदत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी मदत घेण्यास स्पष्टपणे नकार दिला. ते म्हणाले - तुम बाल-बच्चेदार हो, पीछे हट जाओ . यानंतर शत्रूच्या गोळीने कॅप्टन विक्रम यांचा ठाव घेतला आणि ते शहीद झाले. त्यांच्या अतुलनीय धैर्यासाठी त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.