कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या दोन्ही कुस्तीपटूंनी बुधवारी नवी दिल्लीत विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. काँग्रेसने आपल्या अधिकृत एक्स हँडलवर बैठकीचे छायाचित्रही पोस्ट केले आहे. काँग्रेस पक्षाने विनेश फोगाटला हरियाणातील तीनपैकी कोणत्याही विधानसभेच्या जागेवरून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. या तीन जागांमध्ये चरखी-दादरी, बधरा आणि जुलाना या जागांचा समावेश आहे. चरखी दादरी हा विनेश फोगाटचा जिल्हा आहे आणि जाटबहुल क्षेत्र आहे.