तावडेंचा दिल्लीत विनोद; प्रचारसभेतील 'गर्दी'वरून ट्रोल

Vinod Tawde troll from netizens on Delhi Election rally
Vinod Tawde troll from netizens on Delhi Election rally
Updated on

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे हे दिल्लीतील प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले आहेत. त्यांनी त्यांच्या सभांची काही छायाचित्रे सोशल मिडियात शेअर केली आहेत. त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या छायाचित्रावरून त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या छायचित्राच्या खाली गर्दीवर अनेकांनी उपहासात्मक टिपण्या केल्या आहेत.

विनोद तावडे यांच्या फेसबुक पोस्टवरी कमेंटबॉक्समध्ये त्यांना ट्रोल करताना एकाने 'जागतिक नेतृत्व विनोदजी तावडे यांची दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचंड जाहीर सभा' असल्याची कमेंट केली आहे. तर याच्यापेक्षा जास्त संख्या (पटसंख्या) महाराष्ट्रातील पाड्यावरच्या शाळेत असेल तरी तुमच्या काळात 1300 शाळा बंद केल्या, असल्याचे एका युजरने म्हटले आहे.

या सभेवरून महाराष्ट्रातील विरोधकांनीही टीकास्त्र सोडले आहे. तसेच दिल्लीतील आम आदमी पक्षाचे नेतेही विनोद तावडे यांच्यावर टीका करताना त्यांना ट्रोल करताना दिसत आहेत. दिल्लीतील आप नेते भागवंत मन यांनी विनोद तावडे यांच्यावर ट्विटरवरून निषाणा साधला आहे. ते म्हणाले की 'महाराष्ट्रातील १३०० शाळा बंद करणाऱ्या माजी मंत्र्यांनी दिल्लीत येऊन शिक्षणावर भाष्य करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे'.

तत्पूर्वी, दिल्लीत आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यात निकराचा सामना होत आहे. भाजपने आपले विविध राज्यांतील नेते दिल्लीत प्रचारासाठी उतरवले आहेत. दिल्लीचा कोपरा न कोपरा हे नेते फिरत आहेत. त्यातच विनोद तावडे यांनीही या प्रचारात आपल्या परीने रंग भरले आहेत. विनोद तावडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात शिक्षण मंत्री होते. मात्र, २०१९मध्ये महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाकडून तिकीट देण्यात आलं नव्हतं. यावरून त्यांना पक्षाकडून डावलण्यात आल्याचं बोललं जात होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.