Viral Tweet: मी, यूपीएससी अन् माझं कुटुंब! IAS अधिकाऱ्याचे हृदयस्पर्शी प्रवास सांगणारे ट्विट

ओमकार यांनी जेव्हा यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या आईला त्यांनी BDO व्हावं असं वाटत होतं
Viral Tweet
Viral Tweetesakal
Updated on

IAS Officer Tweet: सोशल मीडियावर सध्या ओमकार पवार या IAS अधिकाऱ्याचं एक ट्विट चर्चेत आहे. त्याच्या आयएस बनण्यामागचा रंजक प्रवास तुम्हीही एकदा वाचायलाच हवा. जेव्हा त्यांनी यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या आईला त्यांनी BDO व्हावं असं वाटत होतं. त्यामागे नेमकं काय कारण होतं ते त्यांच्या हृदयस्पर्शी ट्विटच्या माध्यमातून जाणून घेऊया.

ओमकार पवार यांच्या कुटुंबियांनी दुसऱ्यांचे शेत करायला घेतले होते. शेताचा मालक BDO असल्याने त्यांच्या आईला ते सर्वोत्तम पद असल्याचे वाटे. या अधिकाऱ्याचा रूबाब बघून सगळेच हरखून जायचे. म्हणून ओमकार यांच्या आईला ते BDO व्हावे असे वाटे.

ओमकार यांच्या कुटुंबियांकडे बागायती शेती होती. बऱ्याच वेळा त्यांची आई भाजीपाला घेऊन पाचगणीच्या बाजारात विक्रीसाठी जायची. त्यावेळी पाचगणी नगरपरिषदचे कर्मचारी जागेवरून फार त्रास द्यायचे. त्यामुळे जेव्हा माझा मुलगा UPSC पास होईल तेव्हा सरकारी पदाच्या जोरावर मला एक फिक्स जागा मिळवून देईल. आणि मग माझ्याशी वाद घालायची कुणाची हिम्मत होणार नाही. असे त्यांच्या आईला वाटे.

ओमकार हे एका गरीब कुटुंबातून स्वत:च्या मेहनतीच्या आणि जिद्द व चिकाटीच्या बळावर IAS ऑफिसर झालेत. त्यांच्या आयएस होण्यामागे त्यांच्या कुटुंबियांचा फार मोठा हात असल्याचेही ते सांगतात.

आजीचे लाडके असणारे ओमकार कधी दूर जाऊ नये असे त्यांच्या आजीला वाटे. मात्र अभ्यासाठी दिल्ली गाठणारे ओमकार दिल्ली आपल्या गावाच्या जवळच असल्याचे त्यांना समजवून सांगायचे. ओमकार यांनी आयएसची परीक्षा पास केल्यानंतर मुलगा BDO बनण्याची स्वप्न पाहाणाऱ्या आईला त्यांनी माझे काम BDO सारखेच आहे असे सांगितले.

70-80 च्या ज्या काळात मुंबईत गुन्हेगारी वाढली होती तो काळ त्यांच्या कुटुबियांनी जवळून बघितला होता. जेव्हा ओमकार IASच्या ट्रेनिंगसाठी जात होते तेव्हा मायेने जवळ बोलावून 'ट्रेनमध्ये कोणी चॉकलेट दिलं तर खाऊ नको त्यात गुंगीचं औषध असतं' असं सांगणाऱ्या त्यांच्या आईवडीलांचं त्यांना आजही कौतुक वाटतं.

Viral Tweet
Gujrat Exit Polls 2022 : मागच्या दोन निवडणुकांत एक्झिट पोल कसे होते? वाचा भाकितं किती ठरली खरी

ओमकार पवार यांचा एकंदरीत यूपीएससी परीक्षेचा प्रवास मनाला स्पर्श करणारा आहे. भारतात उच्चअधिकारी पदाचा वेगळा मान असण्यामागे सर्वसामान्यांच्या किती भाबड्या आशा लागल्या असतात याचे जाणीव तुम्हाला या पोस्टमधून माध्यमातून नक्कीच होईल.

Viral Tweet
Gujrat Election Result: गुजरात विधानसभेचा निकाल कधी, कुठे, कसा पाहू शकता? जाणून घ्या

ओमकार यांच्या आईसारख्या शेकडो सामान्य लोकांना यूपीएससी पास होऊन देशाच्या विविध क्षेत्रांचा कार्यभार सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांकडून वेगवेगळ्या आशा असतात. त्यांचे प्रश्न आणि समस्या ते मार्गी लावतील असा एक ठाम विश्वास ओमकार यांच्या आईसह देशातील कोट्यावधी जनतेचा असतो. त्याला सत्त्यात उतरवण्यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी यासाठी अहोरात्र मेहनत घेत यूपीएससीची परीक्षा देत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.