Viral Video: "मी अंधभक्त होतो अन् अंधभक्ताला अशीच शिक्षा मिळायला पाहिजे," भाजप समर्थक का झाला हतबल?

Rajeev Rana: बरेलीतील एक भूखंड ताब्यात घेण्यासाठी टोळी युद्ध केल्याचा आरोप असलेल्या राजीव राणा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Rajeev Ranjan Viral Video
Rajeev Ranjan Viral VideoEsakal
Updated on

बरेलीतील एक भूखंड ताब्यात घेण्यासाठी टोळी युद्ध केल्याचा आरोप असलेल्या राजीव राणा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

राजीव राणा यांच्या घर आणि हॉटेलवर उत्तर प्रदेश सरकारने बुलडोझर चालवल्यानंतर ते हतबल झाले आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये राजीव राणा म्हणत आहेत की, "मी अंधभक्त होतो अन् अंधभक्ताला अशीच शिक्षा मिळायला पाहिजे."

काय आहे प्रकरण?

22 जून रोजी पीलीभीत बायपासवरील भूखंड ताब्यात घेण्यावरून प्रॉपर्टी डीलर राजीव राणा आणि आदित्य उपाध्याय यांच्या गटांमध्ये गोळीबार झाला. या गोळीबाराच्या घटनेने शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

यानंतर मुख्य आरोपी राजीव राणा हा फरार झाला होता. दरम्यान आरोपी राजीव राणा यांच्यावतीने न्यायालयात आत्मसमर्पण अर्ज देण्यात आला होता. त्यावर सुनावणीसाठी न्यायालयाने २९ जूनची तारीख निश्चित केली होती.

मात्र तत्पूर्वीच गुरुवारी सकाळी बीडीएचे पोलीस पथक व प्रशासनासह त्यांच्या हॉटेल व घराबाहेर बुलडोझरसह पोहोचले. त्यानंतर त्यांच्या हॉटेलचा बाहेरचा भाग पाडण्यात आला. घर आणि कार्यालयावरही बुलडोझर चालवण्यात आला.

Rajeev Ranjan Viral Video
UGC NET, CSIR-UGC NET च्या कधी होणार परीक्षा? NTA कडून नव्या तारखा जाहीर

'अंध भक्तासोबतही असेच घडले पाहिजे'

राजीव राणा म्हणाले, "प्रशासन एकतर्फी कारवाई करत आहे. मी भाजपचा अंधभक्त आहे, अंध भक्तांच्या बाबतीत असेच व्हायला हवे."

राजीव राणाची पत्नी आणि मुलगी मीडियासमोर रडत म्हणाल्या की, "आम्हाला न्याय हवा आहे आमचे कोणीही ऐकत नाही. कारवाई सीसीटीव्हीमध्ये पाहून करावी."

Rajeev Ranjan Viral Video
Tank Accident: लडाखमध्ये लष्कराच्या रणगाड्याचा अपघात, पाच जवान शहीद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.