Viral Video: पाच कोटींचा पूल आठवड्यातच कोसळला, पाहा व्हिडिओ

Jharkhand Bridge Collapse: मिळालेल्या माहितीनुसार हा पूल सुमारे पाच कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत आहे. दुर्गम भागातील गावांना जोडण्यासाठी हा पूल बांधला जात आहे.
Jharkhand Bridge Collapse
Jharkhand Bridge CollapseEsakal
Updated on

गेल्या काही दिवसांमध्ये बिहारमधून सतत पूल कोसळत असल्याच्या घटना समोर येत आहेत. आता झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातही पूल कोसळल्याची घटना समोर आली आहे.

मुसळधार पावसामुळे बांधकामाधीन पुलाचा गर्डर कोसळला, त्यामुळे एक खांबही वाकल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र या अपघातात कोणी जखमी झाले की नाही याची माहिती समोर आलेली नाही. हा पूल गिरिडीह जिल्ह्यातील अर्गा नदीवर बांधला जात होता. अधिकाऱ्यांनी रविवारी या घटनेची माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार हा पूल सुमारे पाच कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत आहे. झारखंडमधील गिरिडीह आणि बिहारमधील जमुई जिल्ह्यातील गावांना जोडण्यासाठी हा पूल बांधला जात आहे.

एका अभियंत्याने माहिती देताना सांगितले की, गर्डर आठवडाभरापूर्वी तयार करण्यात आला असून त्याला मजबुती मिळण्यासाठी किमान २८ दिवसांचा कालावधी लागतो.

दुसरीकडे बिहारमध्ये पूल कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. गेल्या 10-15 दिवसांत बिहारमधील पाच पूल कोसळले आहेत.

Jharkhand Bridge Collapse
NEET-UG Exam: केंद्र सरकार NEET परीक्षा ऑनलाइन घेणार? पेपरफुटीच्या घटनादरम्यान सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता

काही वर्षांपूर्वी रांचीच्या बंडू ब्लॉकमध्ये असलेल्या कांची नदीवरील पूल असाच कोसळला होता. त्यामुळे डझनभर गावांशी संपर्क तुटला होता. हा पूलही सुमारे 10 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला होता.

हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर जबाबदार अभियंत्यांवर कारवाई केली जाईल, असे सरकारने सांगितले होते. पुलाच्या बांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर केल्याचे उच्चस्तरीय चौकशी समितीच्या निदर्शनास आले होते. हा पूल मुख्यमंत्री ग्राम सेतू योजनेंतर्गत बांधण्यात आला होता.

Jharkhand Bridge Collapse
Mann Ki Baat : प्रत्येकाने आईच्या नावाने एक झाड अवश्य लावावे; 'मन की बात'मध्ये PM मोदी यांचे आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.