Viral Video: केदारनाथमध्ये थोडक्यात बचावले हजारो भाविक, हिमस्खलनाचा तडाखा; पाहा व्हिडिओ

Kedarnath Glacier Burst: या घटनेशी संबंधित एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये बर्फाने वाहणाऱ्या नदीचे दृश्य खूपच भयानक दिसत आहे.
Kedarnath Glacier burst video
Kedarnath Glacier burst videoEsakal
Updated on

पावसाळा असूनही उत्तराखंडमधील 'बाबा केदारनाथ' धामच्या दर्शनासाठी हजारो भाविक जात आहेत. यात्रेच्या पहिल्याच दिवसापासून केदारपुरीत श्रद्धेचा ओघ दिसत होता.

दरम्यान, केदारनाथ मंदिरामागील डोंगरावर हिमस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र, या हिमवादळामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही.

या घटनेशी संबंधित एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये बर्फाने वाहणाऱ्या नदीचे दृश्य खूपच भयानक दिसत आहे.

केदारनाथमधील या हिमस्खलनाचा व्हिडिओ समोर आला आहे. मंदिराच्या पाठीमागे असलेल्या डोंगरावर अचानक हिमस्खलन झाल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

हिमस्खलनात तुटलेला बर्फ प्रचंड वेगाने खाली येत आहे. मात्र, मंदिराच्या मागे गांधी सरोवर असल्याने तुटून खाली येत असलेला वर्फाचा भाग तिथेच अडकला. यामुळे मंदिर परिसरात उपस्थित हजारो लोकांचे प्राण वाचले. केदारनाथ मंदिराचेही नुकसान झाले नाही.

Kedarnath Glacier burst video
NEET-UG Exam: केंद्र सरकार NEET परीक्षा ऑनलाइन घेणार? पेपरफुटीच्या घटनादरम्यान सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता

मंदिर परिसरात उपस्थित अनेक प्रवाशांनी हे दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, गांधी सरोवरावर पहाटे पाचच्या सुमारास हिमस्खलन झाले. यात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

8 जून रोजीही येथे हिमनग तुटण्याची घटना घडली होती. गेल्या वर्षीही मे आणि जून महिन्यात चोरबारी शेजारील कम्पेनियन ग्लेशियर परिसरात 5 वेळा हिमस्खलन झाले होते. यापूर्वी 2022 मध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये या भागात हिमस्खलन झाले होते.

Kedarnath Glacier burst video
Viral Video: पाच कोटींचा पूल आठवड्यातच कोसळला, पाहा व्हिडिओ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.