नवी दिल्ली- दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने एक व्हिडिओ शूट केला आहे. दिल्ली मेट्रोमधील एक व्यक्ती ट्रेनमध्ये अश्लील व्हिडिओ पाहत असल्याचा आणि महिलेला आक्षेपार्हरित्या स्पर्श करत असल्याचा दावा या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला आहे. 'फ्री प्रेस जनरल'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. (Viral Video Man For Allegedly Watching blue video And Touching Woman Inside Delhi Metro)
एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की रिकॉर्डिंग करणारा व्यक्ती समोरच्या व्यक्तीला जाब विचारत आहे. कॅमेऱ्या मागील व्यक्ती म्हणत आहे की, तू काय करत आहेत हे मला दिसत आहे. मी मेट्रोमध्ये आल्यापासून तुला पाहत आहे.
व्हिडिओमधील आरोपी व्यक्ती म्हणतो की, 'काय झालं? मी काय करत आहे? मी फक्त फोनवर बोलत आहे. मी फोनवर देखील बोलू शकत नाही का?' यावर व्हिडिओ शूट करणारा व्यक्ती म्हणतो की, तू फोनवर बोलत होतास की महिलेला वारंवार आक्षेपार्हरित्या स्पर्श करत होतास.
व्हिडिओ शूट करणारा व्यक्ती मेट्रोतील उपस्थितांना सांगतो की, 'हा व्यक्ती मेट्रोमध्ये आल्यापासून अश्लील व्हिडिओ पाहत आहे. शिवाय तो महिलेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे.' व्यक्ती पुढे म्हणतो की, मी सर्व काही व्हिडिओमध्ये रिकॉर्ड केलं आहे. तू मोबाईलमध्ये पॉर्न पाहत होतास. त्यानंतर व्यक्ती आरोपीच्या अशा वागणुकीवर जाम भडकतो. त्याला खडेबोल सुनावतो.
दिल्ली मेट्रोमध्ये अशाच प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी काहीजण मेट्रोमध्ये आक्षेपार्ह वर्तन करत असल्याचं समोर आलं होतं. ऑगस्ट २०२३ मध्ये एका २३ वर्षीय व्यक्तीने महिलेकडे पाहून आक्षेपार्ह हातवारे केले होते. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली होती. (Viral Video)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.